testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

विम्बल्डन टेनिस स्पर्धा : वॉटसन, आझारेन्का यांना धक्‍का

लंडन| Last Modified गुरूवार, 6 जुलै 2017 (09:27 IST)
इंग्लंडची हीथर वॉटसन आणि बल्गेरियाची व्हिक्‍टोरिया आझारेन्का या बिगरमानांकित खेळाडूंनी सरस मानांकित प्रतिस्पर्ध्यांवर सनसनाटी विजयाची नोंद करताना विम्बल्डन टेनिस स्पर्धेचा तिसरा दिवस गाजविला. महिला एकेरीतील दुसऱ्या फेरीच्या लढतीत हीथर वॉटसनने लात्वियाच्या 18व्या मानांकित ऍनेस्तेशिया सेवास्तोव्हाचे आव्हान 6-0, 6-4 असे मोडून काढले. तर महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीतील आणखी एका सामन्यात व्हिक्‍टोरिया आझारेन्काने रशियाच्या 15व्या मानांकित एलेना व्हेस्निनाचा प्रतिकार 6-3, 6-3 असा संपुष्टात आणला. मात्र स्लोव्हाकियाच्या आठव्या मानांकित डॉमिनिका सिबुल्कोव्हाने अमेरिकेच्या जेनिफर ब्रॅडीवर 6-4, 6-4 अशी मात करताना आपले आव्हान तिसऱ्या फेरीतही कायम राखले.
त्याआधी विसावी मानांकित दारिया गाव्हरिलोव्हा, 28वी मानांकित लॉरेन डेव्हिस आणि तिसावी मानांकित शुआई झांग या महिला मानांकितांचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. पेट्रा मार्टिकने गाव्हरिलोव्हाचा प्रतिकार 6-4, 2-6, 10-8 असा मोडून काढला. तर व्हार्व्हरा लेपचेन्कोने लॉरेन डेव्हिसला 6-4, 7-5 असे चकित करीत दुसरी फेरी गाठली. तसेच व्हिक्‍टोरिया गोल्युबिकने शुआई जांगचे आव्हान 6-3, 6-7, 6-1 असे कडव्या झुंजीनंतर संपुष्टात आणले. त्याचप्रमाणे पुरुषांच्या 19व्या मानांकित फेलिसियानो लोपेझने ऍड्रियानो मॅनारिनोविरुद्ध 7-5, 1-6, 1-6, 3-4 असा पिछाडीवर असताना दुखापतीमुळे माघार घेतली.


यावर अधिक वाचा :