Widgets Magazine
Widgets Magazine

विम्बल्डन स्पर्धा : व्हीनस विल्यम्स, कुझ्नेत्सोव्हा, योहाना कॉन्टा उपान्त्यपूर्व फेरीत

लंडन, मंगळवार, 11 जुलै 2017 (09:37 IST)

wimbledon

स्पेनच्या 14व्या मानांकित गार्बिन मुगुरुझाने जर्मनीच्या अग्रमानांकित अँजेलिक कर्बरला पराभऊत करताना विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीत खळबळजनक निकालाची नोंद केली. या विजयामुळे मुगुरुझाने उपान्त्य फेरीत धडक मारली. मुगुरुझाने पहिला सेट गमावल्यानंतर झुंजार पुनरागमन करताना कर्बरचे आव्हान 4-6, 6-4, 6-4 असे सुमारे पावणेदोन तासांत संपुष्टात आणले.
 
याबरोबरच अमेरिकेची दहावी मानांकित व्हीनस विल्यम्स, रशियाची सातवी मानांकित स्वेतलाना कुझ्नेत्सोव्हा, लात्वियाची 13वी मानांकित येलेना ऑस्टापेन्को, अमेरिकेची 24वी मानांकित कोको वान्डेवेघे आणि स्लोव्हाकियाची बिगरमानांकित मॅग्दालेना रिबारिकोव्हा यांनीही आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करताना महिला एकेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत स्थान मिळविले.
 
तब्बल 18 वर्षांपूर्वी आपले पहिले विम्बल्डन विजेतेपद पटकावणाऱ्या व्हीनसने क्रोएशियाच्या ऍना कोन्जुहचा 6-3, 6-2 असा पराभव करताना थाटात आगेकूच केली. धाकटी बहीण सेरेना विल्यम्सने गर्भवती असल्यामुळे या वर्षी विम्बल्डनमधून माघार घेतली असताना व्हीनस पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. व्हीनससमोर उपान्त्यपूर्व फेरीत येलेना ऑस्टापेन्कोचे आव्हान आहे.
 
सातव्या मानांकित स्वेतलाना कुझ्नेत्सोव्हाने पोलंडच्या नवव्या मानांकित ऍग्नेस्का रॅडवान्स्काचा 6-2, 6-4 असा धुव्वा उडवीत आगेकूच केली. कुझ्नेत्सोव्हाला उपान्त्यपूर्व लढतीत कर्बरला चकित करणाऱ्या मुगुरुझाशी झुंज द्यावी लागेल. द्वितीय मानांकित सिमोना हालेपने बल्गेरियाच्या व्हिक्‍टोरिया आझारेन्कावर 7-6, 6-2 अशी सहज मात केली. आता तिला सहाव्या मानांकित योहाना कॉन्टाशी झुंज द्यावी लागेल.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

खेळ मराठी

news

विम्बल्डन टेनिस स्पर्धा : सानिया, बोपन्नाची तिसऱ्या फेरीत धडक

विम्बल्डन-2017 स्पर्धेतील महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरीत भारताच्या सानिया मिर्झाने दमदार ...

news

विम्बल्डन : ऑगटचा निशिकोरीला तिसऱ्याच फेरीत धक्‍का

स्पेनच्या 18व्या मानांकित रॉबर्टो बॉटिस्टा ऑगटने जपानच्या नवव्या मानांकित केई निशिकोरीवर ...

news

सिंधूला स्पोर्टस इलस्ट्रेटेडचा सर्वोत्तम क्रीडापटू पुरस्कार

रिओ ऑलिम्पिकमधली भारताची रौप्यविजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला स्पोर्टस इलस्ट्रेटेडचा ...

news

आशियाई ऍथलेटिक्‍समध्ये मनप्रीत व लक्ष्मणला सुवर्ण

मनप्रीत कौरने महिलांच्या गोळाफेकीत सुवर्णपदक पटकावताना येथे सुरू झालेल्या आशियाई ...

Widgets Magazine