testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

चानूला सुवर्णपदक

नवी दिल्ली| Last Modified शुक्रवार, 1 डिसेंबर 2017 (12:40 IST)
भारताच्या मीराबाई चानू हिने जागतिक भारत्तोलन (वर्ल्ड वेटलिफ्टिंग)
चॅम्पियनशिपमध्ये विश्‍वविक्रम नोंदवून जेतेपदाला गवसणी घातली आहे. तिने 48 किलो वजनी गटात 194 किलो (स्नॅचमध्ये 85 आणि क्लीन-जर्कमध्ये 109 किलो) वजन उचलून भारताला दोन दशकांनंतर सुवर्णपदक मिळवून दिले आहे. अशी कामगिरी करणारी चानू दुसरी भारतीय वेटलिफ्टर ठरली आहे. 22 वर्षांपूर्वी कर्नाम मल्लेश्‍वरी हिने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण कामगिरी केली होती.

अमेरिकेतील अनाहिममध्ये झालेल्या जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशीपमध्ये चानूने सुरुवातीला स्नॅचमध्ये 85 किलो वजन उचलले. त्यानंतर क्लीन-जर्कमध्ये 109 किलो वजन उचलून तिने सुवर्णपदकावर नाव कोरले. यापूर्वी कर्नाम मलेश्‍वरी हिने 1994 आणि 1995 मध्ये जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली होती. तब्बल 22 वर्षांनी भारताला या स्पर्धेत सुवर्णपदक मिळाले आहे.

थायलंडच्या सुकचारोनला रौप्य, तर सेगुरा अना हिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. भारतीय रेल्वे खात्यात काम करणार्‍या चानूला 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकता आले नव्हते, ती कसर तिने आज सव्याज भरून काढली. बक्षीस वितरणावेळी तिरंगा फडकताना पाहून 2014 च्या राष्ट्रकुल स्पर्धेची रौप्यपदक विजेती असलेल्या चानूचे डोळे अभिमनाने भरून आले.


यावर अधिक वाचा :

विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला

national news
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...

भारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...

national news
समलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...

national news
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...

SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...

national news
भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

national news
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...

क्रिकेटच्या सामन्यामुळे सानिया मिर्झा अचानकपणे ट्विटरवरून ...

national news
आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये आज क्रिकेटचा सामना रंगणार आहे. त्यामुळे ...

Facebook वर या चुकांमुळे आपण होऊ शकता ब्लॉक

national news
दुनियेत फेसबुक सर्वात अधिक वापरण्यात येणारा सोशल मीडिया मीडियम आहे. पर्सनल ...

लेस्बियन पत्नी विरुद्ध पतीची पोलीसात तक्रार

national news
उत्तरप्रदेशमधील कानपूरमध्ये एका पतीने पत्नीविरोधात ती लेस्बियन असल्याची तक्रार पोलीस ...

गडकरी शब्द पाळतात, गंगा नदी स्वच्छ होणार : आनंद महिंद्रा

national news
गंगा नदी मार्च २०२० पर्यंत पुर्णपणे स्वच्छ केली जाईल असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ...

नवज्योतसिंग सिध्दू पाकिस्तानचे एजंट

national news
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावणार्‍या नवज्योतसिंग ...