शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 1 ऑक्टोबर 2015 (11:44 IST)

इंडियन सुपर लीगच्या उद्घाटनात ऐश्वर्याचे नृत्य

मुंबई- बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन इंडियन सुपर लीगच्या उद्घाटनीय सोहळ्यात परफॉर्म करेल. या फुटबॉल टूर्नामेंटची सुरुवात 3 ऑक्टोबरला अभिषेक बच्चनची फुटबॉल टीम चेन्नईयन एफसीचा पहिला सामना होणार आहे. अभिषेक, वीता दानी आणि महेंद्रसिंह धोनी या फुटबॉल संघाचे सहमालक आहेत. याच सामन्यात अभिषेकसाठी ऐश्वर्या स्टेज परफॉर्मस देणार आहे. यावेळी ऐश्वर्या अभिषेकला सपोर्ट करण्यासाठी तेथेच असणार आहे. कदाचित यामुळेच, तिला जेव्हा उद्घाटनीय सोहळ्यात परफॉर्म करण्यासाठी आमंत्रण मिळाले तेव्हा तिने सहजतेने ‍होकर दिला.
 
फिल्म निर्देशक संजय गुप्ता यांनी ‍सांगितले की, यात अनेक बॉलीवूडचे दिग्गज परफॉर्म करणार आहे, मात्र ऐश्वर्या संपूर्ण परफॉर्मस झाल्यानंतरही ग्रॅन्ह फिनालेमध्येही परफॉर्म करेल. ती यात तिच्यात काही चर्चित गाण्यांवर परफॉर्म करणार आहे.