शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

ऑलिंपिकसाठी लिएंडर पेस अखेर तयार

WD
पुरुष दुहेरीत विष्णू वर्धनसोबत खेळावे लागणार म्हणून नाराजी व्यक्त केलेल्या टेनिसपटू लिएंडर पेसने त्याच्या ऑलिंपिकमधील सहभागाच्या अनिश्चितत्तेला पूर्णविराम देत या स्पर्धेत भाग घेत असल्याचे जाहीर केले.

विम्बल्डन टेनिस स्पर्धेत सहभागी झालेल्या पेसने पुरुष दुहेरीतील पहिला सामना जिंकल्यानंतर, आपण या स्पर्धेत सहभागी होत असल्याचे सांगितले. भारतीय टेनिस संघटना जो संघ निवडेल, त्या संघातून आपण देशाचे प्रतिनिधित्व करू, असे उद्गार त्याने काढले.
नुकत्याच झालेल्या वादामुळे आपण निराश झालो होतो. पण अशा वादांऐवजी खेळाला प्राधान्य दिले जाईल, असे तो म्हणाला. पुरुष दुहेरीत त्याच्यासोबत खेळण्यास महेश भूपती आणि रोहन बोपण्णा यांनी नकार दिल्यानंतर त्याने स्पर्धेत सहभागी होणार नाही, असा इशारा दिला होता.