शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: ब्रासीलिया , शुक्रवार, 4 जुलै 2014 (11:59 IST)

जर्मनीविरुद्धच्या लढतीसाठी फ्रान्सचा माटुइडी सज्ज

आज रात्री 9.30 वाजता लढत

विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील पहिला उपान्त्पूर्व फेरीचा सामना फ्रान्स आणि जर्मनी संघात येथे खेळला जात आहे. या सामन्यात  फ्रान्सचा विशेष खेळाडू ब्लैसे माटुइडी हा सज्ज झाला आहे. या लढतीत खेळण्यास तो सुर्दैवी ठरला आहे.


त्याचे मैदानावरील अस्तित्व हे माराकाना स्टेडियमवर फ्रान्सच्या संघाला प्रेरणादाक ठरणार आहे. 27 वर्षाचा माटुइडी याला नाजेरिाविरुद्धच्या सामन्यात फक्त पिवळे कार्ड मिळाले.

त्याने नायजेरिाच्या ओगेनई ओनाजी याला धडक दिली. त्यावेळी त्याला दुखापत झाली. फ्रान्सने हा सामना 2-0 ने जिंकल्यानंतर तो नाजेरियाच्या ड्रेसिंग रूममध्ये गेला व त्याने माफी मागितली. तो फ्रेंच विजेता पॅरिस सेंट जर्मन संघाचा खेळाडू आहे.

तो फ्रान्सकडून शुक्रवारी 28 वा सामना खेळेल. फ्रान्स व जर्मनीचे संघ विजेतेपदाचा विजेतेपदाचे दावेदार समजले जात आहेत. 1982 आणि 1986 साली विश्वचषकाच्या उपान्त्य सामन्यात फ्रान्सला जर्मनीकडून पराभूत व्हावे लागले होते. त्या पराभवाची परतफेड करण्यास फ्रान्सचा संघ सज्ज झाला आहे. फ्रान्सने साखळी स्पर्धेत स्वित्झर्लडचा 5-2 ने पराभव केला होता. त्यावेळी माटुइडी याने गोल केला होता.

जर्मनीची मधली फळी ही मजबूत अशी आहे. टोनी क्रूस आणि फिलिप लहम हे आघाडीचे खेळाडू आहेत. माटुइडीने त्याच्या सहकार्‍यापेक्षा सर्वाधिक पासेस दिल आहेत. जर्मनीचे मागचे रेकॉर्ड हे चांगले आहे. परंतु या सामन्यात काहीही घडू शकते, असा इशारा माटुइडीने दिला आहे. गतवर्षी पॅरिसमध्ये   फ्रान्सने जोखीम लोएव याच्या संघाकडून 1-2 ने पराभव केला होता. त्या सामन्यात हा खेळला होता. त्याला पुन्हा पाचारण करण्यात आले आहे. मेसूट ओजील हा प्ले मेकर खेळाडू आहे. 4-4-2 या रचनेमुळे आमचे सर्व प्रश्न सुटले आहे, असेही तो म्हणाला.

या दोन्ही संघात पाच सामने खेळले गेले आहेत. 1958 साली प्ले ऑफ सामन्यात तिसर्‍या स्थानासाठी फ्रान्सने पश्चिम जर्मनीचा 6-3 ने पराभव केला होता. पश्चिम जर्मनीचा संघ यजमान स्वीडनशी 1-3 ने पराभूत झाला होता. त्यानंतर 1977 साली पॅरिस येथे फ्रान्सचा पश्चिम जर्मनीचा 1-0 ने पराभव केला होता. 1982 साली विश्वचषकाच्या उपान्त्य सामन्यात पश्चिम जर्मनीने 3-3 अशा बरोबरीनंतर पेनाल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सचा 5-4 ने पराभव केला होता. 1986 साली पश्चिम जर्मनीने फ्रान्सला उपान्त्य सामन्यात 2-0 ने नमविले होते. त्यामुळे शुक्रवारी खेळला जाणारा हा सामनाही अटीतटीचा होण्याची शक्यता आहे.

फ्रान्सने साखळीत होंडुरास, स्वित्झर्लड यांचा पराभव केला. तर इक्वेडोरशी बरोबरी साधली. जर्मनीने पोतरुगालचा पराभव केला. तर घानाशी बरोबरी साधली. अमेरिकेला नमवून बाद फेरी गाठली. बाद फेरीत फ्रान्सने नाजेरियाचा 2-0 तर जर्मनीने अल्जेरिाचा 2-1 असा पराभव केला होता.