शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 3 डिसेंबर 2015 (10:11 IST)

ज्योत्स्ना चिन्नाप्पा 13 व्या स्थानावर

चेन्नई- नुकत्याच घोषित करण्यात आलेल्या जागतिक व्यावसायिक महिला स्क्वॅशपटूंच्या मानांकन यादीत भारताच्या ज्योत्स्ना चिन्नाप्पाने 13 वे स्थान मिळविले आहे. तिच्या मानांकनात चार अंकांनी सुधारणा झाली. या यादीत भारताची दीपिका पल्लीकल 14 व्या स्थानावर आहे. पुरूष स्क्वॅशपटूंच्या मानांकन यादीत भारताचा सौरभ घोषाल 18 व्या, महेश माणगांवकर 62 व्या, हरिंदरपाल संधू 66 व्या आणि कुशकुमार 97 व्या स्थानावर आहेत. महिला विभागात सचिका इंगळे 87 व्या स्थानावर आहे.