गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 30 ऑगस्ट 2016 (12:33 IST)

पी.वी. सिंधू बनेल CRPF कमांडंट आणि ब्रँड अॅम्बेसेडर

रियो ऑलिंपिक खेळांमध्ये सिल्वर मेडल जिंकणारी शटलर पी.वी. सिंधूसाठी एक अजून आनंदाची बातमी आहे. सोमवारी देशातील सर्वात मोठे खेळ सन्मान 'राजीव गांधी खेल रत्न' मिळवल्यानंतर देशातील सर्वात मोठे अर्धसैनिक बल (सीआरपीएफ) सिंधूला आपले ब्रँड अॅम्बेसेडर नियुक्त करणे आणि तिला कमांडंट मानद रॅक देण्याचा निर्णय घेतला आहे.  
 
आधिकारिक सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार सीआरपीएफने या बाबत गृह मंत्रालयाला याबद्दल एक आधिकारिक प्रस्तावपण पाठवला आहे आणि  जरूरी मंजुरी मिळाल्यानंतर सिंधूला एका समारंभात या रॅकने सन्मानित करण्यात येणार आहे आणि तिला हा बैज सोपवण्यात येणार आहे जेथे तिला सीआरपीएफची वर्दी (गणवेश) देण्यात येईल.  
 
वृत्तानुसार सिंधूला या बाबत माहिती देण्यात आली आहे आणि या संबंधात सीआरपीएफने तिची सहमती देखील घेतली आहे. सीआरपीएफमध्ये कमांडंटची रॅक पोलिस अधीक्षकाच्या पदासारखा आहे आणि या पदाचा अधिकारी जेव्हा तैनात असते तेव्हा 1,000 सैनिकांची बटालियनला आदेश देऊ शकतो. काही वर्षांअगोदर सीमा सुरक्षा बल बीएसएफने क्रिकेटर विराट कोहलीला आपला ब्रँड अॅम्बेसेडर नियुक्त केले होतो.