शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By wd|
Last Modified: इन्चिऑन , मंगळवार, 30 सप्टेंबर 2014 (12:05 IST)

बॉक्सिंग क्वीन मेरी कोमचा पंच, फायनलमध्ये धडक

भारताची बॉक्सिंग क्वीन एमसी मेरी कोम हिने एशियार्डमध्ये शानदार कामगिरी करत फायनलमध्ये धडक दिली आहे. मेरीने 17 आशियाई क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंगच्या फ्लायवेट किलो ग्रॅम वजनी गटाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.
 
मेरीच्या या कामगिरीमुळे आशियाई स्पर्धेतील भारताचे 'रौप्यपदक' निश्चित झाले आहे. त्यामुळे मेरीने आता सुवर्णपदक जिंकावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.  मेरीने सेमीफायनलमध्ये व्हिएतनामच्या थी बांग लीचा 3-0 असा पराभव केला. दरम्यान, मेरी आतापर्यंत पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरली आहे.