गुरूवार, 28 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By wd|
Last Modified: ग्लासगो , बुधवार, 30 जुलै 2014 (09:58 IST)

भारताची कुस्तीमध्ये सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक

राष्टकुल स्पर्धेच्या सहाव्या दिवशी भारताने कुस्तीत सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक साधली आहे. तर दोन रौप्पदके मिळाली आहेत. यामुळे भारताच्या सुवर्णपदकांची संख्या 10 झाली आहे.
 
सुशीलकुमारने 74 किलो वजनीगटात सुवर्णपदक पटकावून पाकच्या उमर अब्बासला हरविले आहे. अमितकुमारने प्रथम कुस्तीत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. 57 किलो वजनीगटात त्याने नाजेरियाच्या विल्सनला अस्मान दाखविले. विनेशने इंग्लंडच्या यानाला महिलांच्या 48 किलो वजनीगटात हरवून सुवर्णपदकाची कमाई केली. जेती आखाडे हिला कुस्तीत 75 किलो वजन गटात रौप्य पदक तर राजीव तोमर याला 125 किलो वजन गटात रौप्य पदक मिळाले आहे.
 
नेमबाजीनंतर कुस्तीतही भारताला मोठे यश मिळाले असून तीन सुवर्णपदकांमुळे भारताच्या खात्यात 10 सुवर्णपदकांची नोंद झाली आहे. पुरुष गटात अनुक्रमे 57 आणि 74 किलो वर्गात अमितकुमार आणि सुशीलकुमार यांनी सुवर्णपदके मिळवली. अमितने नायजेरियाचा कुस्तीपटू ई. वेल्सन याला हरवले. त्यानंतर सुशीलकुमारनेही काही क्षणांमध्येच पाकिस्तानच्या कुस्तीपटूवर मात करत कुस्तीतील भारताचा दरारा दाखवून दिला.
 
त्याआधी महिला गटात भारताची कुस्तीपटू विनेश फोगट हिने फ्रीस्टाइल स्पर्धेत 48 किलो वजनी वर्गात भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. विनेशने इंग्लंडची कुस्तीपटू याना रेटिगन हिचा पाडाव केला. लढतीचा पूर्वार्ध आणि उत्तरार्धात विनेशचेच वर्चस्व राहिले.
 
सुवर्णपदक मिळाल्यानंतर आनंद व्यक्त करताना 19 वर्षी विनेश म्हणाली की, सुवर्णपदक मिळाल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. मी या स्पर्धेत प्रथमच सहभागी झाले आहे. माझे कुटुंब कुस्तीगीरांचे असल्यामुळे मला घरातून पाठिंबा मिळाला. त्यांच्या ‍ पाठिंब्यामुळेच मी ही कामगिरी करु शकले.