शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 13 सप्टेंबर 2016 (14:50 IST)

युवा व्यवहार क्षेत्रात भारत आणि मोझांबिक सहकार्यासंदर्भात सामंजस्य करार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि मोझांबिक यांच्यात युवा व्यवहार आणि क्रीडा क्षेत्रात परस्पर सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधानांच्या मोझांबिक दौऱ्यादरम्यान 7 जुलै 2016 रोजी स्वाक्षरी केलेल्या सामंजस्य कराराबाबत माहिती दिली. 
 
या करारामुळे दोन्ही देशांमध्ये खेळांना प्रोत्साहन मिळणार आहे. तसेच युवकांमध्ये संकल्पना, मूल्ये आणि संस्कृती यांची देवाण-घेवाण आणि मैत्रीपूर्ण संबंध विकसित होण्याच्या दृष्टीने हा करार सहाय्यक ठेरल. 
 
युवा व्यवहार आणि क्रीडा क्षेत्रात दोन्ही देशातील युवकांना आपले न्याय आणि कौशल्य यांची देवाण-घेवाण करत आंतरराष्ट्रीय परिदृष्य विकसित करण्याच्या दृष्टीने हा करार महत्त्वाचा ठरेल.