शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

येत्या सहा महिन्यात मरे अव्वलस्थानी राहील

WD
ब्रिटनचा अँडी मरे हा टेनिसपटू येत्या सहा महिन्यात जागतिक टेनिसमध्ये अव्वलस्थानी राहील, अशी आशा रिचर्ड क्रॅजिसेक यांनी बोलून दाखविली आहे.

अँडी मरेने रविवारी रात्री विम्बल्डन खुली ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा जिंकली व 77 वर्षानंतर त्याने पुरुष एकेरीची स्पर्धा जिंकून इतिहास निर्माण केला व ब्रिटनला दीर्घकाळानंतर पहिलेच विम्बल्डन विजेतेपद मिळवून दिले. त्यानंतर क्रॅजिसेक प्रतिक्रिया देत होते. मरे हा आणखी किमान पाच ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकू शकेल, असेही त्यांनी सांगितले. मरेचा खेळ पाहून क्रॅजिसेक प्रभावीत झाले आहेत. येत्या दोन वर्षात आणखी एकदा रॉजर फेडरर निर्माण झाल्यस मरेचे ग्रँडस्लॅम कमी होऊ शकतील.