गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 15 डिसेंबर 2015 (10:47 IST)

राष्ट्रकुल टेटे स्पर्धेतून पाकची माघार

नवी दिल्ली- राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धेतून पाकिस्तानने माघार घेतली आहे, मात्र केवळ पाकिस्तानच नव्हे, तर ऑस्ट्रेलिया आणि अन्य 12 देशांनी या स्पर्धेपासून दूर राहण्याचे ठरवले आहे. ही स्पर्धा 16 तारखे पासून सुरतला होत आहे.
 
भारतीय टेबल टेनिस महासंघाचे सचिव धनराज चौधरी यांनी पाक, तसेच ऑस्ट्रेलियाचा सहभाग नसल्याच्या बातमीस दुजोरा दिला. ते म्हणाले, वर्ष संपत आले आहे. त्यामुळे अनेक संघटनांना आर्थिक प्रश्न भेडसावत आहे.
 
आता ऑस्ट्रेलियासही सहभागी होता येत नाही, यावरून सर्व काही लक्षात येईल. यामुळे यंदा स्पर्धा केवळ भारत, सिंगापूर तसेच इंग्लंड या संघांमध्येच होतील. वळवळ दरम्यान, भारताचा अव्वल खेळाडू शरथ कमाल हाही या स्पर्धेत नसेल. त्याला जर्मनीत अपघात झाला आहे. स्पर्धेसाठी भारतात येण्याच्या एक दिवस अगोदर त्याला अपघात झाला. या स्पर्धेतील तो पहिला विजेता आहे.