शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: रिओ , रविवार, 11 सप्टेंबर 2016 (09:32 IST)

रिओ पॅरालिम्पिक : मरियप्पनला सुवर्ण, वरुणला कांस्य

रिओमध्ये सुरू असलेल्या पॅरालिम्‍पिक स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी 'धबल धमाका' उडवून दिला. उंच उडी प्रकारात भारताच्‍या मरियप्‍पन थांगावेलूने सुवर्णपदक मिळवले आहे तर वरूण सिंह भाटीया यानेही याच क्रीडा प्रकारात कास्‍य पदक पटकाविले आहे. तब्‍बल बारा वर्षानंतर भारताला सुवर्ण पदक मिळाले आहे. 
 
मरियप्‍पन याने १.८९ मीटर उंच उडी मारली त्‍यामुळे त्‍याला सुवर्ण तर वरूणने १.८६ मीटर उंच उडी मारल्‍याने त्‍याला कास्‍यपदक मिळाले आहे.