गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By

रिओ: बॅडमिंटनपटू सिंधू, श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत

रिओ- पी. व्ही. सिंधू आणि किदांबी श्रीकांतने ऑलिंपिक बॅडमिंटन स्पर्धेच्या एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करीत भारताच्या पदकाच्या आशा कायम ठेवल्या आहेत. श्रीकांत जागतिक क्रमवारीत अकरावा आहे. त्याने पाचव्या स्थानावर असलेल्या यान जॉगरसेन याला 21-19, 21-19 असे दोन सरळ गेममध्ये हरविले. श्रीकांतने डेन्मार्कच्या प्रतिस्पर्धीविरुद्धची लढत 42 मिनिटात जिंकली. 
 
महिला एकेरीत उपउपांत्यपूर्व फेरीत पी. व्ही. सिंधूने चायनीज तैपेईच्या तई तुझू-यिंग हिचा 21-13, 21-15 असा सरळ दोन गेममध्ये पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत सिंधूची लढत चीनच्या वँग यिहान हिच्याशी होणार आहे वँग यिहान जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे.