शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: पॅरिस , मंगळवार, 9 जून 2015 (11:47 IST)

लुसी साफारोवा पहिल्या दहाजणात

फ्रेंच खुल्या ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे उपविजेते मिळविणारी लुसी साफारोवाने जागतिक महिला टेनिस मानांकनात पहिल्या दहा खेळाडूंत प्रवेश मिळविला.
 
झेकच्या लुसीने अंतिम फेरीत तीन सेट्सपर्यंत लढत दिली. जगात अग्रस्थानी असलेल्या अमेरिकेच्या सेरेना विलिअम्सविरुद्ध एक सेटही जिंकला. लुसीने तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळ केला. 33 वर्षाच्या सेरेनाने फ्रेंच स्पर्धा जिंकून आपले अग्रस्थान काम ठेवले. रशियाची मारिया शारापोव्हाची चौथ्या स्थानी घसरण झाली आहे. विम्बल्डन विजेती पेत्रा क्विटोवा दुसर्‍या तर रुमानियाची सिमोना हालेप तिसर्‍या  स्थानी आली आहे.
 
पहिले सोळा खेळाडू असे (कंसात देश व गुण)
 
1. सेरेना विलिअम्स (अमेरिका-11291), 2. पेत्रा क्विटोव्हा (झेक-6870), 3. सिमोना हालेप (रुमानिा-6130), 4. मारिया शारापोव्हा (रशिया - 5950), 5. करोलिन वुझनिाकी (डेन्मार्क- 5000), 6. अँना इव्हानोविक (सर्बिया - 4305), 7. लुसी साफारोवा (झेक- 4055), 8. एकटेरिना माकारोवा (रशिया - 3620), 9. कार्ला सुआरेज (स्पेन- 3345), 10. अँजेलिक केरबेर (जर्मनी- 3120), 11. युजिनी बाऊचर्ड (कॅनडा- 3118), 12. करोलिना प्लिसकोवा (झेक- 3010), 13. अग्निएसजका राडवानस्का (पोलंड- 2765), 14. आंद्रिया पेटकोविक (जर्मनी- 2660), 15. रिमी बॅकसिन सजकी (स्वित्झर्लड- 2628), 16. व्हिनस विलिअम्स (अमेरिका- 2586).