गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

वर्ल्ड चॉम्पियन मायकल शूमाकर कोमात!

WD
'फॉर्म्युला वन'चा माजी वर्ल्ड चॅम्पियन मायकल शूमाकर कोमत असल्याचे त्याच्या उपचार करणार्‍या डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे शूमाकरची प्रकृती अधिक गंभीर झाल्याचेही ते म्हणाले. फ्रान्सच्या आल्प्स पर्वतरांगामध्ये स्कीईंग करताना शूमाकरचा भीषण अपघात झाला होता. त्यात शूमाकरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

शूमाकर हेल्मेट घातले होते. मात्र स्कीईंग करताना त्याचे डोके दगडवर आपटले गेले. त्याच्या मेंदूला जबर दुखापत झाल्याने तो कोमात केला आहे. त्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाल्याचे डॉक्टरांनी सां‍गितले आहे.

दरम्यान, शूमाकरने आपल्या कारकीर्दीत 302 पैकी 91 रेसमध्ये विजेतेपद मिळवले. 2000 ते 2004 या काळात टीम फेरारीसाठी खेळताना शूमाकर सलग पाचवेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरला होता. 1991 साली बेल्जियन ग्रांप्रीमधून एफ वनमधून शूमाकरने पदार्पण केले होते. त्यानंतर 21 वर्षांच्या कारकीर्दीत शूमाकरने तब्बल सातवेळा 'फॉर्म्युला वन'ची ड्रायव्हर्स वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली आहे.