शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By wd|
Last Modified: लंडन , मंगळवार, 24 जून 2014 (11:23 IST)

विंबलडन अल कायदाच्या निशाण्यावर

ब्रिटनमध्ये सुरु होणारी टेनिसमधील सगळ्यात मोठी स्पर्धा 'विंबलडन'ला दहशतवादी संघटना अल कायदाच्या निशाण्यावर आहे. ब्रिटनमधील प्रतिष्ठित वृत्तपत्र 'डेली एक्सप्रेस'मध्ये याबाबत वृत्त प्रसिद्ध झाले आहे. देशात वास्तव्य करणार्‍या अल कायदाचे दहशवादी 'विंबलडन'ला टार्गेट करू शकतात असे म्हटले आहे.

'डे‍ली एक्स्प्रेस'मधील वृत्तानुसार, ब्रिटनला भीती आहे, की दहशतवादी विंबलडनदरम्यान बॉम्ब स्फोट घडवू शकतात. अल कायदाने सीरिया आणि इराकमध्ये सुरु असलेल्या बंडखोरांच्या हिंसाचाराला पाठिंबा दिला आहे. तसेच इराक आणि ‍सीरियामध्ये सुरु असलेला संघर्ष ब्रिटनपर्यंत पोहोचवण्यासाठी अल कायदा प्रयत्न करत असल्याचाही संशय ब्रिटनच्या प्रशासनाने व्यक्त केला आहे.

विंबलडन स्पर्धा 23 जूनपासून सुरु होत आहे. विंबलडनच्या उद्‍घाटन सोहळ्याला सिने इंडस्ट्री, राजकीय तसेच शाही कुटूंबातील सदस्य उपस्थित राहणार आहे. दोन आठवडे चालणार्‍या या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी देश-विदेशातील लाखों प्रेक्षक येथे उपस्थित होतात. या पार्श्वभूमीवर सुरक्षा वाढविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.