शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वार्ता|
Last Modified: मियामी , गुरूवार, 10 डिसेंबर 2009 (11:01 IST)

वुड्स दारु प्यायला होता- एलिन

जागतिक क्रमवारीतील क्रमांक एकचा गोल्फर टायगर वुड्स हा 27 नोव्हेंबरला दारू प्यायला होता, असा आणखी एक गोप्यस्फोट खुद्द त्याची पत्नी एलिनने केला आहे. कार अपघात झाला तेव्हा तो दारूत तर्र झाला होता, असे एलिनने फ्लोरिडा पोलीसांना सांगितले.

रुग्णालयातून मिळालेली माहिती अशी की, वुड्सला अपघातानंतर रुग्णालयात दाखल केले तेव्हा त्याने दारू ‍प्यायल्याचे चाचणीत स्पष्ट झाले होते. त्याला श्वास घेण्‍यास त्रास न होण्यासाठी त्याच्या श्वास नलिकेत एक ट्यूब टाकण्यात आली आहे.

अपघातानंतर वुड्‍स कोणत्याच सार्वजनिक कार्यक्रमात दिसला नाही. सध्या तो आपल्या कुटुंबियांसह आहे की दुसर्‍या ठिकाणी आहे, हे मात्र कळू शकले नाही.