शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

व्हेटेलची जगज्जेतेपदास पुन्हा एकदा गवसणी

WD
रेड बुल रेसिंगच्या सेबॅस्टियन व्हेटेल याने रविवारी अपेक्षेनुसार चौथ्या भारतीय ग्रांपी स्पर्धेत विजेतपद मिळविले. व्हेटेल याचे हे चौथे विश्वविजेतेपद आहे.

या विजेतेपदामुळे त्याने आता मायकेल शुमाकर व जुआन मॅन्युएल फँगिओ यांच्या पंक्तीत बसण्याचा मान मिळविला आहे. व्हेटेल याने बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवरील याआधीच्या तीनही स्पर्धांमध्ये विजेतपद मिळविले आहे.जर्मनीच्या २६ वर्षीय व्हेटल याने आत्तापर्यंत एकूण ३६ विजेतेपदे मिळविली असून या मोसमामधील त्याचे हे दहावे विजेतेपद आहे. यानंतर अबुधाबी,अमेरिका व ब्राझील येथे ग्रांपी स्पर्धा होणार असून व्हेटल याने या पाश्र्वभूमीवर ३२२ गुणांची आघाडी घेतली आहे.रेड बुल रेसिंगच्या सेबॅस्टियन व्हेटेल याने जागतिक फॉम्र्युला वन मालिकेतील घोडदौड कायम राखत विश्वविजेतेपदाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले होते. भारतीय ग्रांप्रीसाठी पात्रता फेरीत सर्वोत्तम वेळ नोंदवीत त्याने पोल पोझिशन पटकावली होती. बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवरील पाच किलोमीटर १२५ मीटर अंतराच्या लॅपसाठी व्हेटेलने एक मिनीट २४.११९ सेकंद अशी सर्वोत्तम वेळ नोंदविली होती. मर्सिडीजच्या निको रॉस्बर्गपेक्षा त्याची वेळ ०.७५२ सेकंदांनी सरस ठरली, तर लुईस हॅमिल्टन सहकारी रॉस्बर्गपेक्षा केवळ ०.०७ सेकंदांनी मागे होता.व्हेटेलचा सहकारी मार्क वेबरने चौथे स्थान मिळविले.

व्हेटेलने पात्रता फेरीत पिरेल्लीचा सॉफ्ट टायर वापरला, तर वेबरने मीडियम टायर लावला.नियमानुसार स्पर्धकांना पात्रता फेरीचेच टायर शर्यतीच्या सुरवातीला वापरावे लागतील. व्हेटेलचा नजीकचा प्रतिस्पर्धी फर्नांडो अलोन्सो याने मीडियम टायरला प्राधान्य दिले. तो आठव्या स्थानावर आला.सॉफ्ट टायर वेगवान वेळ देतात; पण लॅपगणिक ग्रीप कमी होत जाते. त्यामुळे ते लवकर बदलावे लागतात व त्यासाठी पीट-स्टॉप आधी घ्यावा लागतो. या तुलनेत मीडियम टायर वेग तुलनेने कमी असला तरी दीर्घ काळ सातत्य राखू शकतात. त्यामुळे पीट-स्टॉपनंतर घेतला तरी चालतो. गुणतक्त्यात व्हेटेलचे २९७, तर अलोन्सोचे २०७ गुण आहेत.व्हेटेलला सलग चौथ्या जेतेपदापासून केवळ अलोन्सो रोखू शकतो. त्यासाठी व्हेटेलला किमान पाचवा क्रमांक मिळवावा लागेल. तसे झाल्यास अलोन्सोने शर्यत जिंकली तरी फरक पडणार नाही.व्हेटेलचे सॉफ्ट, तर अलोन्सोचे मीडियम असे विरुद्ध प्रकारचे टायर लक्षात घेतल्यास शर्यत उत्कंठावर्धक होऊ शकते.
फेरारीचा फिलिपे मासा पाचवा, लोटसचा किमी रैक्कोनन सहावा, तर साऊबरचा निको हुल्केनबर्ग सातवा आला.सरकारने फॉम्र्युला वनला खरे तर पाठिंबा दिला पाहिजे. ते शक्य नसल्यास किमान अडथळे तरी आणू नयेत. खासगी कंपनीच्या पुढाकारातून शर्यत होत असल्यास ती सुरळीत पार पडावी म्हणून सहकार्य करायला हवे, असे आवाहन फोर्स इंडियाचे प्रमुख विजय मल्ल्या यांनी केले आहे.