गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By भाषा|
Last Modified: हैदराबाद , गुरूवार, 23 जुलै 2009 (14:31 IST)

सर्वच आव्हान खडतर: साईना

जागतिक स्पर्धेतील सर्वच लढती खडतर असतात. या स्पर्धांसाठी खेळाडू कसून सराव करतात. यामुळे या स्पर्धांमधील 'ड्रॉ' सोपा किंवा कठीण म्हणता येणार नाही, असे मत भारताची बॅडमिंटन स्टार साईना नेहवाल हिने व्यक्त केले.

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्या फेरीत साईनाला बाय मिळाला असला तरी पुढील फेर्‍यांमध्ये तिला कठोर आव्हान असणार आहे. या स्पर्धेत तिसऱ्या फेरीत साईनाची लढत दहाव्या मानांकित पेट्या नेदेलचेवा हिच्याविरुद्ध अपेक्षित आहे. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत तिचा प्रतिस्पर्धी दुसरी मानांकित वॅन लिंग असण्याची शक्यता आहे.