शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By भाषा|
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 30 जुलै 2009 (14:46 IST)

साईना नेहवालला कांजण्या

भारताची बॅडमिंटन स्टार साईना नेहवाल कांजण्यामुळे आजारी पडली आहे. परंतु पुढील महिन्यात होणारी जागतिक बॅडमिंटन स्पर्धा खेळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अर्जुन पुरस्कार मिळालेल्या साईनाला शनिवारी ताप आला होता. परंतु बुधवारी तिला कांजण्या झाल्याचे स्पष्ट झाले. यामुळे पुढील काही दिवस संपूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला तिला देण्यात आला आहे. साईना म्हणाली, 'डॉक्टरांनी मला कांजण्या झाल्याचे सांगितले असून पुढील काही दिवस विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे. दहा ऑगस्टपासून जागतिक बॅडमिंटनशिप स्पर्धा सुरु होत असताना मला विश्रांती करावी लागत असल्याने दु:ख होत आहे. स्पर्धेपूर्वी मी तंदुरुस्त झाली तरी सरावाची कमतरता राहील. '

साईनाचे प्रशिक्षक पी.गोपीचंद हे साईनाच्या आजारपणामुळे निराश झाले. परंतु जागतिक बॅडमिंटन स्पर्धेपूर्वी ती तंदुरुस्त होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.