गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: दिल्ली , सोमवार, 29 ऑगस्ट 2016 (15:50 IST)

साक्षीचा जोडीदार पैलवान

साक्षी मलिक आता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत साक्षी मलिकने ही माहिती दिली.

साक्षी म्हणाली की, माझ्या जोडीदाराच नाव अद्याप उलगडणार नसून, तोही माझ्यासारखा पैलवान आहे. त्यामुळे आगामी टोकीयो ऑलिम्पिकच्या तयारीमध्ये त्याच्याकडून कोणताही अडथळा होणार नाही. उलट तो मला सतत प्रोत्साहन देतो.

माझ्या स्वप्नांना स्वत:ची स्वप्ने मानतो. त्यामुळे लग्नानंतरही मला एका पतीपेक्षा चांगला मित्र मिळणार आहे. तसेच माझ्या ऑलिम्पिक तयारीत तो मला सहकार्य करेल. त्यामुळे माझ्या कुस्तीच्या सरावात लग्नानंतर कोणतेही अडथळे येणार नाहीत, असा विश्वासही तिने यावेळी व्यक्त केला.