शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 27 ऑगस्ट 2015 (10:18 IST)

सानिया मिर्झाच्या खेलरत्नला स्थगिती

टेनिसस्टार सानिया मिर्झाला राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याच्या केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या निर्णयाला कर्नाटक हायकोर्टाने स्थगिती दिली आहे. 
 
क्रीडा मंत्रालयाच्या या निर्णयाला पॅरालिम्पिक अॅथलीट एच. एन. गिरीशाने कर्नाटक उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. जागतिक क्रमवारीत दुहेरीमध्ये अव्वल स्थान मिळविल्यानंतर क्रीडा मंत्रालयाने सानियाचा सन्मान करण्याच निर्णय घेतला होता. मात्र लंडन 2012 पॅरालिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक मिळविणार्‍या गिरीशाने आपणच या पुरस्कारासाठी योग्य असल्याचे सांगून न्यायालयात या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली होती.
 
हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीला अर्थात 29 ऑगस्ट रोजी 'क्रीडा दिना'ला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार होता.