शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By wd|
Last Modified: इंचेऑन , मंगळवार, 30 सप्टेंबर 2014 (12:40 IST)

सानिया व साकेतला सुर्णपदक

सानिया मिर्झा आणि साकेत मिनेनी या भारताच्या खेळाडूंनी 17 व्या आशियाई टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीचे सुवर्णपदक मिळवून दिले. या पदकासह टेनिसमध्ये भारताने पाच पदके मिळविली आहेत.
 
दुसर्‍या स्थानावरील सानिया साकेत या जोडीने अग्रस्थानावरील चीन ताईपेईच हाओ चिंग छन आणि हेइन नि पेंग या अग्रमानांकित जोडीचा 69 मिनिटात 6-4, 6-3 असा पराभव केला आणि भारताला सुवर्ण मिळवून दिले. पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात मिनेनीला  सनमसिंगचच्या जोडीने सुवर्णपदक मिळविता आले नाही. सनमसिंगला लागोपाठ दुसरे सुवर्णपदक मिळविता आले नसले तरी त्याने या स्पर्धेत एक सुवर्ण, एक रौप्यची कमाई केली आहे. त्याने 2010 साली वांगझु येथील आशियाई स्पर्धेत सोमदेव देववर्मनसह सुवर्णपदक घेतले होते. 2010 साली भारताने आशियाई स्पर्धेत पाच पदके मिळविली होती.
 
त्यावेळी दोन सुवर्ण पदकांचा समावेश होता. यावेळी लिएंडर पेस, सोमदेव देवर्मन, रोहन बोपन्ना नसतानाही भारताच्या तरुण टेनिसपटूंनी पाच पदके मिळविली. युकी भांबरीने कांस्पदक पुरूष एकेरीत मिळविले तर त्याने दीविज शरणसह पुरूष दुहेरीत कांस्य मिळविले. सानियाने प्रार्थना ठोंबरेसह महिला दुहेरीत कांस्पदक मिळविले होते. सानियाची आशिया स्पर्धेतील पदक संख्या ही आठ झाली आहे.
 
टेनिसपटूंनी रौप्यपदक मिळविताना जोरदार संघर्ष केला परंतु दक्षिण कोरियाच्या योग क्यू लिम आणि हेॉन चूँग यांच्याकडून 7-5, 7-6 (2) असा पराभव पत्करला. भारताची जोडी पाचव्या स्थानावर होती तर दक्षिण कोरियाची जोडी ही आठव्या स्थानावर होती तरीही कोरियाची जोडीने एक तास 29 मिनिटात ही लढत जिंकली.
 
येथे खेळल्या जात असलेल्या आशियाई टेनिस स्पर्धेत भारताच्या पथकाने पाच पदके मिळविली. हे फारच चांगले आहे, असे भारताची आघाडीची महिला टेनिसपटू सानिया मिर्झा हिने सांगितले.
 
या स्पर्धेमध्ये भारताने अव्वल दर्जाचा संघ पाठविला नव्हता. लिएंडर पेस, रोहन बोपन्ना, सोमदेव देववर्मन असे खेळाडू या स्पर्धेमध्ये  उतरू शकले नाहीत. तरीही भारताच्या उदोन्मुख खेळाडूंनी भारताला टेनिसमध्ये पाच पदके मिळवून दिली. याचे मला कौतुक वाटते, असे ती म्हणाली. सानिया सुरुवातीस या स्पर्धेस सहभागी होणार नव्हती परंतु शेवटी एटीपी गुणासाठी व्यावसायिक स्पर्धा न खेळता ती भारताकडून या स्पर्धेत खेळली.
 
ती पुढे म्हणाली की, हा आठवडा फारच उत्तम ठरला. आम्ही (सायना आणि प्रार्थना) महिला दुहेरीत कांस्पदक मिळविले, हे मोठे आहे. आजपर्यंत असे पदक मिळविले नव्हते. मला नेतृत्व करावे लागले. कारण आमच्यासमवेत तरुण खेळाडूंचा संघ होता. सर्वोत्तम संघ उपलब्ध नसताना या तरुण खेळाडूंनी विजय मिळविले. साकेत मिनेनीसह मिश्र दुहेरीच्या उपान्त्य फेरीत खेळण्यापूर्वी ती बोलत होती. 27 वर्षाच्या   सानियाने शेवटच्या क्षणी या स्पर्धेत येण्याचा निर्णय घेतला व तिला पदक मिळाले.