शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 एप्रिल 2015 (11:10 IST)

सानियाकडे गोड बातमी!

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा लवकरच गोड बातमी देणार आहे असे संकेत तिच्या पती क्रिकेटर शोएब मलिक याने दिले आहेत. टि्वटर चाहत्यांनी त्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना त्याने हे गुपित फोडले आहे. शोएबला छोटे मलिक कधी येणार असा प्रश्न विचारल्यावर त्याने लवकरच येत आहेत असे उत्तर दिल्याने सानिया प्रेग्नंट असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

सानियाने नुकत्याच मिळविलेल्या दुहेरीतील यशाबाबत आपल्याला खूप अभिमान असल्याचे सांगतानाच शोएबने हा भारत व पाक दोन्ही देशांसाठी आनंदाचा व अभिमानाचा विषय असल्याचे सांगितले आहे. सानिया किती मेहनत घेते याची मला चांगलीच जाणीव आहे असे सांगतानाच शोएबने आम्हाला मुलगी झाली तर तिचे नांव मिराल किवा रिम असे ठेवण्याची इच्छा असल्याचेही सांगितले आहे. मुलगा झाला तर तो क्रिकेटर होईल किंवा टेनिसही खेळेल असेही उत्तर त्याने दिले आहे.

सानिया एक दिवस पाकिस्तानकडून टेनिस खेळेल काय या प्रश्नाला उत्तर देताना त्याने कधीच नाही असे स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर असे घडले तर ती अत्यंत चुकीची गोष्ट होईल, सानियाने काही बदलावे अशी आपली कधीच इच्छा नव्हती आणि नाही असेही तो म्हणाला.