गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 30 मार्च 2015 (07:24 IST)

सायनाचा इतिहास

भारताची ‘फुलराणी’ सायना नेहवालने ‘इंडिया ओपन सुपर सीरिज’ बॅड‍मिंटन स्पर्धेवर आपले नाव कोरले आहे. थायलंडच्या रॅटचानोक इन्तानोनवर 21-16, 21-14 अशी सरळ मात केली. विशेष बाब म्हणजे सायना ही स्पर्धा जिंकणारी पहिली भारतील महिला बॅड‍मिंटनपटू ठरली आहे. याआधीच सायनाने जागतिक क्रमवारीत पहिला क्रमांक पटकवण्याची पराक्रम केला आहे.
 
‘इंडिया ओपन सुपर सीरिज’या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पहिल्यांदाच दाखल झालेल्या सायना नेहवालवर घरच्या प्रेक्षकांसमोर चांगला खेळ करण्याचे दडपण होते. तसेच प्रतिस्पर्धी रॅटचानोक इन्तानोनने 2013 मध्ये या स्पर्धेत विजय मिळवला होता. मात्र सायनाने मैदानात उतरल्यापासूनच आक्रमता दाखवत 21-16 अशा ङ्खरकाने पहिला सेट जिंकला. त्यानंतर दुसर्‍या सेटमध्येही सायनाने आक्रमकता कायम ठेवली आणि दोघांमधील गुणसंख्येत बरेच अंतर राहील, असा प्रयत्न केला. रॅटचानोक इन्तानोनच्या खेळात मात्र ती आक्रमकता दिसली नाही. सायनाच्या खेळीमुळे ती चुका करत गेली आणि सायनाने दुसरा सेट 21-14 ने जिंकत स्पर्धेत विजय मिळवला. सायनाच्या विजयासोबतच भारतीय प्रेक्षकांनी प्रचंड जल्लोष केला.