गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. फिल्लमबाजी
Written By

काय होते आणि किती उंची गाठली या कलाकरांनी...

हे ‍स्टार्स सिनेसृष्टीत येण्यापूर्वी अगदी साधारण होते परंतू त्यांनी हिंमत हरली नाही आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपले नाव सोनेरी अक्षरात लिहून काढले.
अमिताभ बच्चन सिनेमात येण्यापूर्वी एका निजी कंपनीत सेल्समॅन होते.
धर्मेन्द्र एका ट्यूबवेल कंपनीत विहीर खोदण्याचे काम बघायचे.
रजनीकांत मुंबईच्या बेस्ट-बसमध्ये कंडक्टर म्हणून काम करायचे.
दिलीप कुमार सिनेकलाकारांच्या घरी जाऊन ड्राय फ्रूट्स विकायचे. देव आनंद मिलिट्रीच्या सेंसर पोस्ट ऑफिसमध्ये क्लार्क होते. अक्षय कुमार मार्शल आर्ट शिकण्यासाठी बँकॉक गेले होते आणि तिथे अक्षयने शेफ आणि वेटरची नोकरीदेखील केली होती. मुंबई परतल्यावर तो मार्शल आर्टचा शिक्षक झाला आणि येथे त्याने ज्वेलरी विकण्याचे कामदेखील केलेले आहे. आपल्या स्टाइलमुळे प्रसिद्ध राजकुमार सिनेमात येण्यापूर्वी मुंबई पोलिसमध्ये सब इंस्पेक्टर होते. जितेंद्र खोट्या दागिन्यांचा व्यवसाय करत होते. एकदा निर्माता-दिग्दर्शक व्ही. शांताराम यांना आपल्या चित्रपटासाठी दागिन्यांची गरज होती आणि जितेंद्र ते पोहचवायला गेले तर शांतारामने जितेंद्रला सिनेमात काम करण्याची संधी दिली. जॅकी श्रॉफ सिनेमात येण्यापूर्वी मुंबई स्थित मलबार हिल्सच्या तीन बत्ती एरियात दादागिरी करत होते. नवाजुद्दीन सिद्दकीने एका पेट्रोकेमिकल कंपनीत केमिस्ट म्हणून काही वेळ काम केले आहेत. ओम पुरीने चहाच्या दुकानात काम केले होते. बोमन ईरानीने ताज महल पॅलेस ऍड टॉवरमध्ये वेटर आणि रूम सर्व्हिस स्टॉफच्या रूपात काम केलेले आहे. नंतर त्यांनी आपल्या आईच्या बेकरी शॉपमध्येही हातभार लावला होता. काही काळ बोमनने फोटोग्राफीदेखील केली होती. सिनेमात येण्यापूर्वी प्रसिद्ध कॉमेडियन जॉनी वाकर मुंबईमध्ये बेस्ट बसमध्ये कंडक्टर होते. अभिनेता बलराज साहनीची दृष्टी त्यांच्यावर पडली आणि जॉनीला सिनेमात काम करण्याची संधी सापडली. मेहमूदने अनेक लहान-सहान कामं केली. ते राजकुमार संतोषीचे वडील पीएल संतोषी यांचे ड्राइवरही राहून चुकले होते. मीना कुमारीला टेबल टेनिस शिकवण्यासाठी त्यांना पैसेही मिळाले होते. सुनील दत्त रेडियो सीलोनमध्ये अनाउंसर होते. कादर खान बायकुला स्थित एमएच साबू सिद्दिक कॉलेज ऑफ इंजीनियरिंगमध्ये सिव्हिल इंजीनियरिंग शिकवायचे. एका नाटकात दिलीप कुमारने कादर खानचा अभिनय बघितला आणि कादर सिनेमात आले.