शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By वेबदुनिया|

अमिताभचे दहा सर्वश्रेष्ठ चित्रपट (स्लाइड शो)

अमिताभ बच्चन यांनी अनेक यादगार चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यातील चांगले चित्रपट निवडणे खरोखरीच कठीण आहे. तरीपण आम्ही प्रयत्न करीत आहोत अमिताभच्या दहा सर्वश्रेष्ठ चित्रपटांची निवड करण्याचा. 
आनंद (1971)

पात्र - डॉ. भास्कर के. बैनर्जी
दिग्दर्शक - हृषिकेश मुखर्जी
खरेतर या चित्रपटाचा नायक म्हणून राजेश खन्नाची निवड करण्यात आली होती. बाबू मोशायच्या रूपात अमिताभ सहाय्यक अभिनेता होते. पण, आपल्या ताकदीच्या अभिनयाने त्यांनी लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधले. 'आनंद' राजेश खन्ना यांचा श्रेष्ठ चित्रपट म्हणता येईल. पण, चित्रपट पाहिल्यावर अमिताभच डोळ्यासमोर राहतात.
दुय्यम भूमिका असूनही अमिताभ यांनी आपली वेगळी छाप सोडली. येथूनच अमिताभ यांनी खन्ना यांच्या किल्यास सुरूंग लावण्यास सुरूवात केली.

जंजीर (1973)

पात्र - विजय खन्ना
दिग्दर्शक - प्रकाश मेहरा
प्रकाश मेहरा यांना जेव्हा दिग्गज नायकांनी हा चित्रपट करण्यास नकार दिला तेव्हा त्यांनी हताश होऊन अमिताभ यांना संधी दिली. प्राण यांच्याबरोबर अमिताभ यांनी पहिला शॉट दिला तेव्हा प्रभावीत झालेल्या प्राण यांनी मेहरा यांना कोप-यात नेले आणि म्हणाले, 'हा मुलगा नक्कीच सुपरस्टार बनणार' एंग्रीयंग मॅनची झोप 'जंजीर' पाहिल्यावरच उडाली होती. अमिताभची अदा निर्माता-दिग्दर्शकांना खुणावत राहिली.

WD WD

अभिमान (1975)

पात्र - सुबीर कुमार
दिग्दर्शक - हृषिकेश मुखर्जी
एक अभिनेता या नात्याने अमिताभ यांना या चित्रपटात आपल्या अभिनयाच्या अनेक छटा दाखविण्याची संधी मिळाली. रोमांस, संगीत आणि इर्षा सारख्या भावना मिळून त्यांची भूमिका होती. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी ही भूमिका यादगार बनविली. अमिताभ आणि जया यांचा हा सर्वश्रेष्ठ चित्रपट ठरला.

दिवार (1975)
पात्र - विजय खन्ना
दिग्दर्शक - यश चोप्रा
त्या काळात हीरो नकारात्मक भूमिका करणे पसंत करत नव्हते. 'दीवार' मध्ये अमिताभची भूमिका ग्रे-शेड साठी होती. आपल्या ईमानदार आणि आदर्श भावाच्या विपरीत तो गुन्हेगार आहे. त्याच्या या वागण्याने नाराज असणारी त्याची आई त्याची साथ सोडते.

ही नकारात्मक भूमिका असूनही अमिताभ यांना प्रेक्षकांची सहानुभूती मिळाली. देवावर राग व्यक्त करणे आणि मंदिराच्या पाय-यांवर आईच्या कुशीत जीव तोडणारे अमिताभ, हे दृश्या हिंदी चित्रपटातील आठवणीतल दृश्य ठरले.
WD WD

शोले (1975)
पात्र - जय (जयदेव)
दिग्दर्शक - रमेश सिप्पी
हा हिंदी चित्रपटातील यशस्वी चित्रपटामधील 'शोले' मध्ये जय आणि विरूची जोड़ी गाजली. वीरूच्या तुलनेत जय कमी बोलत होता. अमिताभ बच्चन यांनी कमी संवाद बोलून आपले डोळे आणि चेह-यावरील भावांतून आपली भूमिका प्रेक्षकांच्या मनात पोहोचवली.
जया बच्चन यांच्याबरोबरचा त्यांचा रोमांसही पाहण्याजोगा होता. गब्बरला पकडण्यासाठी जयने अपल्या प्राणाची बाजी लावली. हे दृश्य बघताना चित्रपटगृहातील लोकांच्या डोळ्यातून पाणी येत असे.

अमर अकबर एंथोनी (1977)
पात्र - एंथोनी गोंजाल्विस
दिग्दर्शक - मनमोहन देसाई
मनमोहन देसाई यांच्या 'अमर अकबर एंथोनी' मध्ये अमिताभ यांनी एंथोनीची भूमिका केली. या चित्रपटात त्यांनी डिशुम, डिशुम हाणामारीही केली.

एका दृश्यात घायाळ अमिताभ आरशासमोर उभे राहून आरशातील आपल्या प्रतिबिंबाला मलमपट्टी करतानाचे दृश्या दाखविण्यात आले आहे. असंबध्द बडबड करणा-या अमिताभ यांच्या या भूमिकेने लोकांना खूप हसविले.
WD WD

मुकद्दर का सिकंदर (1978)
पात्र - सिकंदर
दिग्दर्शक - प्रकाश मेहरा
'मुकद्दर का सिकंदर' ची कहाणी 'देवदास' चित्रपटाशी मिळतीजुळती होती. सिकंदरच्या रूपात अमिताभ त्याग आणि बलिदान करतात. आपल्या मित्राच्या खुशीसाठी ते विष पितात. चित्रपटातील अनेक दृश्यातील त्यांचा अभिनय पाहण्याजोगा आहे.

शक्ति (1982)
पा‍त्र - विजय कुमार
दिग्दर्शक - रमेश सिप्पी
हा चित्रपट भलेही गाजला नाही पण, प्रेक्षकांना दोन महान हस्तींची अभिनय पाहण्याची संधी मिळाली. अमिताभ यांच्यासमोर त्यांचे आदर्श महानायक दिलीप कुमार होते.

अमिताभ यांनी या भूमिकेत स्वत:ला झोकून दिले. दिलीप कुमार यांच्यासमोर अभिनय करणे सोपे नाही, असे अमिताभ यांनी म्हटले होते. म्हणूनच यावेळी त्यांना अनेकवेळा रिटेक द्यावा लागला.
WD WD

सरकार (2005)
पात्र - सुभाष नागरे
दिग्दर्शक - रामगोपाल वर्मा
यातील अमिताभ यांचे पात्र बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आधारीत आहे. समांतर सरकार चालवणार हा व्यक्ती आहे. ज्याच्या इशा-यावर लोक नाचतात. पण, तो आपल्या घरचे प्रश्न सोडवू शकत नाही. मोठ्या मुलाशी त्याचे चांगले सबंध नाहीत. अमिताभ यांनी ही भूमिका इतक्या आत्मविश्वासाने वठवली की, सर्वांनीच कौतुक केले. यानंतर 'सरकार राज' (2008) मध्ये प्रदर्शित झाला.


ब्लॅक (2005)
पात्र - देबराज सहाय
दिग्दर्शक - संजय लीला भंसाली
अमिताभ यांना वाटते की, देबराज सहायची भूमिका करून आपण अभिनयाचे शिखर गाठले आहे. या चित्रपटावर त्यांना गर्व आहे. एक कडक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपले सर्वस्व पणाला लावतो. हा चित्रपट पाहिल्यानंतर वाटते की, त्यांच्या अभिनयाला काही सीमाच नाही.