शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. फिल्लमबाजी
Written By

कमी शिकले हे कलाकार

ह्या कलावंतापुढे सगळ्या शैक्षणिक पदव्या फिकट आहे कारण यांनी आपले लक्ष्य साधण्यासाठी शिक्षणाकडे दुर्लक्ष केले. बघू असे काही कलाकार जे जीवनात तर खूप पुढे वाढले पण शिक्षणाच्याबाबतीत मागे राहून गेले.

सलमान खान

 
दबंग स्टार सलमान खानने ग्वाल्हेरच्या सिंधिया स्कूल आणि त्यानंतर मुंबईच्या एका मिशनरी शाळेतून शिक्षण केले. त्यानंतर मुंबईच्या नॅशनल लॉ कॉलेजमध्ये प्रवेशही घेतला पण ग्रॅज्युएट होण्याआधीच कॉलेज सोडून दिलं. यानंतर त्याने सिनेमात करियर केलं.




आलिया भट्ट
आलिया भट्टने 2011 साली मुंबईच्या जमनाबाई नर्सी स्कूलमधून शिक्षण केलं. यानंतर तिला स्टूडेंट ऑफ द इयर या सिनेमाची ऑफर मिळाली आणि तिनी शिक्षण सोडण्याचं ठरवलं.

दीपिका पदुकोण
दीपिकाने दोनदा ग्रॅज्युएशन पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पण यश मिळालं नाही. आधी तिनी बंगलोरच्या माउंट कार्मल कॉलेजमधून ग्रॅज्युएशन करण्याचं ठरवलं पण कोर्स पूर्ण झाला नाही. यानंतर ती सिनेमात करियर करून यशस्वी झाली. तरीही तिची इग्नू येथून शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा होती पण ती पूर्ण होऊ शकली नाही.

आमिर खान
थ्री इडियट्स चित्रपटात टॉप करणार्‍या आमिर खानने रिअल लाईफमध्ये शाळेनंतर शिक्षण सोडून दिलं. आमिरने नर्सी कॉलेजातून हायर सेकंडरी केलं पण तो शाळेत कमीच जायचा. त्यांचं पूर्ण लक्ष चित्रपट पाहण्यात आणि ऍक्टींगकडे असायचं. यानंतर त्याने पुढे शिक्षण करण्याबद्दल विचारच केला नाही आणि सिनेसृष्टीत करियरची सुरुवात केली.
 

करीना कपूर
आपल्या तरुणपणात करीनाची वकील बनण्याची इच्छा होती. यासाठी तिने मुंबईतल्या एका कॉलेजमध्ये प्रवेशही घेतला होता पण हिंदी सिनेसृष्टीत गाजलेल्या कपूर घराण्यात राहून तिचं सिनेमाशी दूर राहणं शक्य नव्हतं. एका वर्षानंतरच तिने हा कोर्स सोडून ऍक्टींग स्कूलमध्ये प्रवेश घेतला. या प्रकारे करीनाने रिफ्यूजी या चित्रपटातून सिनेमात पदार्पण केलं आणि नेहमीकरता शिक्षण सोडून दिलं.