बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. व्हॅलेंटाईन डे
Written By

व्हॅलेंटाईन-डे वर राशीप्रमाणे करा देवाची पूजा, द्या हे गिफ्ट

मेष- लाल, नारंगी, शेंदुरी रंगाचं ग्रीटिंग कार्ड किंवा गिफ्ट द्या. फूलही या रंगाचे द्या.
या दिवशी गणपती किंवा हनुमानाला या रंगाचे फूल अर्पित कर.
 
वृषभ- पार्टनरला पांढरे किंवा हलक्या रंगाचे कार्ड किंवा फूल भेट करा.
पांढर्‍या रंगाच्या फुलांनी देवी सरस्वतीची आराधना करा.
 
मिथुन- हिरव्या रंगाने चित्रित कार्ड, बागेचे फोटो, किंवा हिरव्या रंगाचे फूल भेट करा.
शाकम्भरी देवीचे पूजन या रंगाच्या फुलांनी करावे.
कर्क-पांढर्‍या रंगाचे चित्र असलेले कार्ड, पांढर्‍या किंवा क्रीम रंगाचे फूल भेट द्या.
या रंगाच्या फुलांनी लक्ष्मी देवीचे पूजन करावे.
 
सिंह- रक्त वर्णाचे गुलाब, कमळ किंवा इतर फुलांचे बुके, किंवा कार्ड भेट द्या.
या फुलांच्या रंगाने प्रभू रामाचे पूजन करावे.
 
कन्या-पांढर्‍या, हिरव्या किंवा पोपटी रंगाच्या फुलांचा बुके किंवा कार्ड भेट करा.
या रंगाच्या फुलांनी अन्नपूर्णा देवीचे पूजन करावे.
तूळ- पांढरे, क्रीम किंवा हलक्या रंगाचे बुके व कार्ड भेट करा.
या रंगाच्या फुलांनी किंवा पांढर्‍या कमळने देवी लक्ष्मीचे पूजन करावे.
 
वृश्चिक- रक्त वर्णाचे शेंदुरी, नारंगी रंगाच्या फुलांचा बुके किंवा कार्ड भेट करा.
या रंगाच्या फुलांनी गणपतीचे पूजन करावे.
 
धनू- पिवळ्या- क्रीम रंगाच्या फुलांचा बुके किंवा कार्ड भेट करा.
या रंगाच्या फुलांनी गणपतीचे पूजन करावे.
मकर- स्काय ब्लु, निळा, जांभळा या रंगाच्या फूल किंवा कार्ड भेट करा.
आशुतोष देवाचे पूजन या रंगाच्या फुलांनी करावे.
 
कुंभ- स्काय ब्लु, निळा, काळा या रंगाच्या फूल किंवा कार्ड भेट करा.
या रंगाच्या फुलांनी शनी महाराजांची पूजा करावी.
 
मीन- पिवळ्या, क्रीम, नारंगी रंगाच्या फुलांचा बुके किंवा कार्ड भेट करा.
या रंगाच्या फुलांनी दुर्गा देवीची आराधना करावी.