शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. व्हॅलेंटाईन डे
Written By वेबदुनिया|

आज 'व्हॅलेंटाईन डे'

आज 'व्हॅलेंटाईन डे'

तो म्हणाला आज 'व्हॅलेंटाईन डे'

ती म्हणे,नवे काय? रोजचेच रडे

चल ना गं. मस्त कॅण्डेललाइट डिनर घेऊ

ती म्हणे बरं.! मुलांना सोबत घेऊन जाऊ

तो लाडात. थोडा रोमॅण्टिक !

ती मात्र जुनी. तशीच अँण्टिक !

त्यानं म्हटलं, आज बायको नको गं.

तुझ्यातली प्रेयसी हवी

ती हसत म्हणाली, तुम्हाला काय.!

रोज नवी फॅण्टसी हवी

तो म्हणाला चालेल गं, इतकंही हसलीस तरी !

हाती हात घेऊन घटकाभर जवळ बसलीस तरी

त्याच्या स्वच्छ नजरेला ती भुलून गेली

आणि मधाळंसं हसत पुन्हा फुलून गेली

त्याला म्हणाली.

वेड्या....!

हा 'व्हॅलेंटाईन डे' फक्त

वर्षातून एकदाच साजरा होतो..

तुझ्या नजरेनं माझा चेहरा मात्र

कुठल्याही 'डे' ला लाजरा होतो..

नजरेत नजर मिसळायला

कॅण्डललाइटचं टेबल लागत नाही

अन् एकरूप झालेल्या जीवांना

'व्हॅलेंटाईन'चं लेबल लागत नाही.