मंगळवार, 19 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. व्हॅलेंटाईन डे
Written By
Last Modified: रविवार, 14 फेब्रुवारी 2016 (22:47 IST)

प्रेम व्यक्त करणे झाले सोपे

प्रेम व्यक्त करण्यासाठी गेल्या दशकभरात प्रेम पत्रांनी आपले स्थान टिकवून ठेवले होते. मात्र हे पत्र भलत्याच हाती लागल्यावर पडणारा मार बर्‍याच तरुणांना त्याकाळी बसलाच असणार. आता हायटेक युगात ऑनलाइनचा वापर होत आहे. ऑनलाइनवरून प्रेम व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर रंगबेरंगी फुलं, चॉकलेट, आकर्षक भेटवस्तू या तरुणांना बर्‍याच भावल. त्यांनी तरुणाईच्या गुलाबी क्षणांवर बरेच वर्ष अधिराज्य गाजवले. पिवळ्या रंगाचे फूल म्हणजे मैत्री, पांढरे म्हणजे फक्त ओळख तर लाल म्हणजे प्रेम असे संकेतही त्यातून निर्माण झाले. त्यानंतर कुछ मिठा हो जाएचा जमाना आला. आणि प्रेम व्यक्त करताना चॉकलेट देणेदेखील प्रथाच झाली. आता प्रत्यक्ष भेटून, भेटवस्तू देऊन तसेच ऑनलाइनने मस्त डिझाइन केलेल्या संदेशातून प्रेमाचा धागा दृढ केला जात आहे. 
 
गेल्या एक दोन वर्षात तर तरुणाई आणि मोबाइल असं समीकरणच झाले आहे. त्यामुळे एसएमएस आणि फोनने तर प्रेम व्यक्त करण्यात क्रांतीच घडवली असे म्हणावे लागेल. इंटरनेट, फेसबुक, व्हॉटस्अँप यासारख साधनांमुळे तरुणाईला फार मोठी मदतच झाली, असे म्हणण्यास काही वावगे ठरणार नाही. ऑकरुट आणि फेसबुकमुळे ऑनलाइन प्रेम व्यक्त करण्याचा नवा फंडाही तरुणांनी आजमावला आहे. नोकरीमुळे फेसबुक आणि व्हॉटस्अँपवरच ऑनलाइन आणि स्क्रॅब पाठवून ते आपला व्हॅलेंटाइन दिवस साजरा करणार आहेत. एकूणच का तर प्रेम व्यक्त करण्याच्या पध्दती बदललेल्या असल्या तरी प्रेम मात्र सारखेच असल्याचे चित्र आहे.