शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. विधानसभा निवडणूक 2014
Written By
Last Modified: मुंबई , शनिवार, 13 सप्टेंबर 2014 (10:30 IST)

अखेर फौजिया खान यांनी मंत्रिपद सोडले

फौजिया खान यांनी अखेर मंत्रिपद सोडले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून फौजिया खान वादाच्या भोवर्‍यात सापडल्या होत्या. फौजिया खान यांना मंत्रिपदावरून हटवा, अशी मागणी शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी केली होती.

राष्ट्रवादीच्या नेत्या फौजिया खान यांचा विधान परिषद सदस्यत्वाचा कालावधी 12 मार्च 2014 ला संपला होता. मात्र, नियमाचा आधार घेऊन त्या मंत्रिपदी राहिल्या. दोन्ही सभागृहांचे सदस्यत्व नसले, तरी सहा महिने मंत्रिपदावर राहता येते, या नियमाचा फायदा फौजियांनी घेतला. मात्र, सदस्य नसताना मंत्रिपदी राहणे, नैतिकतेला धरून नाही, असे विरोधी पक्षांचे म्हणणे होते.