बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. विधानसभा निवडणूक 2014
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 2 सप्टेंबर 2014 (11:15 IST)

...तर शिवसेनेविरोधात उमेदवार उभे करू- जानकर

आगामी विधानसभा तोंडावर आली असताना  जागावाटपाबाबत शिवसेना आपल्याला कोणताही प्रतिसाद मिळत  नसल्याचा आरोप राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर  यांनी केला आहे.शिवसेनेची हीच भूमिका राहिल्यास  शिवसेनेविरोधात आम्ही आपले उमेदवार उभे करू अस इशारा   जानकर यांनी एका मराठी वृत्त वाहिनीशी सोमवारी बोलताना  सांगितले. 
 
विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून महायुतीत रान  पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे भाजप आणि शिवसेनेतही  तणाव निर्माण झाला आहे. त्यात रिपाइंने जागा वाढवून  मिळवण्याची मागणी केली आहे तर दुसरीकडे आघाडीमध्ये  जागावाटपावरून सध्या रस्सीखेच पाहायला मिळत आहे. 
 
जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी महायुतीतील घटक पक्षांनी  कंबर कसली आहे. भाजप आणि शिवसेनेने रिपब्लिकन पक्ष,  स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसंग्राम आणि राष्ट्रीय समाज  पक्ष या महायुतीतील मित्र पक्षांशी स्वतंत्रपणे चर्चा करण्याचा निर्णय  घेतला आहे. भाजपला 50 टक्के जागा दिल्या जाणार असल्याचे  समजते.मात्र शिवसेना आम्हाला कोणताही प्रतिसाद मिळालेला  नाही. शिवसनेला आमची गरज नसेल तर आम्हालाही शिवसेनेची  गरज नाही. आम्ही फक्क भाजपशी युती करून शिवसेनेविरोधात  उमेदवार उभे करू असा इशार जानकर यांनी दिला आहे.