बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. विधानसभा निवडणूक 2014
Written By wd|
Last Modified: सातारा , सोमवार, 29 सप्टेंबर 2014 (11:28 IST)

दिल्लीचे पार्सल परत पाठवू- विलास उंडाळकर

पृथ्वीराज चव्हाण हे दिल्लीचे पार्सल आहेत, त्यांना दिल्लीला परत पाठवले पाहिजे. चव्हाण यांना 'मिस्टर क्लिन' म्हटले जात असले तरी त्यांनी आपल्या कारकीर्दीत जनतेला तर फसवले असून काँग्रेसचीही फसवणूक केली आहे. आता त्यांना घरीच बसवले पाहिजे, अशा शब्दात दक्षिण कराडमधील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विलास उंडाळकर यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली.

दक्षिण कराडमधील विद्यमान आमदार उंडाळकर यांचे तिकीट कापून काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. चव्हाण व उंडाळकर हे एकाच पक्षात असून दोघे एकमेकांचे विरोधक आहेत. आपल्याला डावलल्यामुळे नाराज झालेल्या उंडाळकरांनी आता अपक्ष उमेदवारी दाखल करत चव्हाणांना आव्हान दिले आहे.

काँग्रेस पक्ष व एकनिष्ठ कार्यकर्त्यांना संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आत येथील जनता घरी बसवल्याशिवाय राहणार नाही,’ असा निर्धारही उंडाळकरांनी बोलून दाखवला. 

उंडाळकरांनी कराड जाहीर सभा घेवून चव्हाणांवर घणाघाती टीका केली. चव्हाण राज्यासह सातारा जिल्ह्याचाहीि विकास केल्याचे सांगत आहेत. मात्र त्यांनी कधी, कुठे, कोणाचा व कसा विकास केला हा खरे तर संशोधनाचाच विषय आहे. त्यांच्या वेळखाऊ धोरणामुळेच काँग्रेस पक्ष संपत आला आहे. त्यांनी मला उमेदवारी मिळण्यात आडकाठी आणली, मतदारसंघात माझे चिन्ह पळवले. मात्र मला जनतेतून संपवता येणार नाही हे समजल्यावर चव्हाणांनी माझ्यावर वैयक्तिक पातळीवर आरोप सुरू केले.