गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. विधानसभा निवडणूक 2014
Written By wd|
Last Modified: मुंबई , मंगळवार, 23 सप्टेंबर 2014 (11:41 IST)

निम्म्या जागांसाठी आता राष्ट्रवादीचा हट्ट

विधानसभा निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील जागांचा तिढा अद्याप सुटण्याची लक्षले दिसत नाहीत. काँग्रेसचा 124 जागांचा प्रस्ताव राष्ट्रवादीने फेटाळून निम्म्या 144 जागांचा हट्ट धकरला आहे. जागा वाटपाचा हा पेच सोडविण्यासाठी आघाडीतील प्रमुख नेत्यांची आज (मंगळवारी) सकाळी बैठक होणार आहे.
 
या बैठकीला राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ उपस्थित राहणार आहेत. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक सोमवारी झाली. या बैठकीत काँग्रेसकडून देण्यात आलेला 124 जागांचा प्रस्ताव फेटाळून निम्म्या 144 जागांची मागणी रेटण्यात आली. ही मागणी रेटतानाच मंगळवारी सकाळी मुख्यमंत्र्यांसह काँग्रेसच्या नेत्यांसोबत होणार्‍या बैठकीत व्यावहारिक तोडगा निघेल, अशी आशाही राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याकडून व्यक्त करण्यात आली.