गुरूवार, 28 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. विधानसभा निवडणूक 2014
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 13 सप्टेंबर 2014 (10:44 IST)

महाराष्ट्रात 15 ऑक्टोबरला मतदान, दिवाळीपूर्वीच मिळणार नवे सरकार

केंद्रीय निवडणूक आयोगाने (शुक्रवारी) दुपारी महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा केली. महाराष्ट्रात 15 ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. दिवाळीपूर्वीच महाराष्‍ट्राला नवे सरकार मिळणार आहे. आजपासून राज्यात आदर्श आचारसंहीता लागू झाली आहे. हरियाणात 27 ऑक्टोबरला होणार आहे.
 
येत्या 20 सप्टेंबर रोजी विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जारी होणार आहे. तसेच 27 सप्टेंबर ही अर्ज भरण्याची मुदत असून 1 ऑक्टोबर ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे.  या विधानसभा निवडणुकीत 'नोटा'चा वापर करता येणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयुक्त व्ही.एस.संपत यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. निवडणुकीच्या काळात अनुचित प्रकार टाळण्यासाठी  कडक पोलिस बंदोबस्त असेल. 
 
महाराष्ट्रातील 288 पैकी 29 जागा अनुसूचीत जातींसाठी तर 25 मतदारसंघ अनुसूचीत जमातीसाठी राखीव आहेत. महाराष्ट्र विधानसभेची मुदत 7 नोव्हेंबर रोजी संपत आहे. महाराष्ट्रात 8 कोटी 26 लाख मतदार आहेत. तसेच 90 हजार 403 मतदान केंद्रांवर मतदान होणार असून शेवटच्या दिवसापर्यंत मतदार याच्या अपडेट होईल.