शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. विधानसभा निवडणूक 2014
Written By wd|
Last Modified: मुंबई , मंगळवार, 26 ऑगस्ट 2014 (17:05 IST)

राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे पक्षात संभ्रम

महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे हे आगामी विधानसभा निवडणूक लढवणार की नाही याबाबत राजकीय वर्तुळात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.  राज ठाकरे याबाबत येत्या चार पाच दिवसांत निर्णय देणार आहे. यामुळे मनसे सैनिक मात्र कमालीचे अस्वस्थ दिसत आहेत. 
 
राज ठाकरे यांनी गेल्या दोन दिवसांत दोनदा 'युटर्न' घेतला आहे. नागपूर येथील दौर्‍यात पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे यांनी निवडणूक न लढण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर दुसर्‍या दिवशी मुंबईत पोहोचल्यानंतर लगेच घुमजाव करत आपण तसे बोललोच नव्हतो असे सांगितले. मीडियाने आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचेही राज ठाकरे यांनी म्हटले होते. विधानसभा निवडणूक लढवेन, अशा खणखणीत घोषणा राज ठाकरे यांनी स्वत: केली होती. नंतर अवघ्या तीन महिन्यात निवडणूक लढवायची तर कुठून? कारण संपूर्ण महाराष्ट्र हा आपला मतदार संघ असल्याचे सांगत भावनिक प्रश्न उपस्थित केला आहे. परंतु आता राज ठाकरे यांच्या या 'लहरी' भूमिकेची जनतेला सवय झाली आहे. कारण राज यांची 'यू टर्न' घेण्याची ही काही पहिली वेळ नाही.