मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. विधानसभा निवडणूक 2014
Written By wd|
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 2 सप्टेंबर 2014 (10:56 IST)

विधानसभा निवडणूक ऑक्टोबरच्या तिसर्‍या आठवड्यात?

देशातील चार राज्यांमधील होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती मिळाली आहे. परंतु चारही राज्यातील निवडणूक एकाच वेळी घेण्यात येणार नसल्याचेही समजते. महाराष्ट्र आणि हरियाणा  राज्य विधानसभांच्या निवडणुका सर्वप्रथम होण्याची चिन्हे आहेत. या निवडणुका ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवडय़ात अर्थात  दिवाळीपूर्वी होण्याची शक्यता आहे. येत्या 9 ते 14 सप्टेंबरदरम्यान निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याचे संकेत केंद्रीय  निवडणूक आयोगाने दिले आहेत. 
 
महाराष्ट्राच्या विधानसभेचा कार्यकाळ आठ नोव्हेंबर रोजी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वीच निवडणुकीची धडामधूम करण्याचा निवडणूक आयोगाचा मानस आहे.
 
तसेच जम्मू-काश्मीर व झारखंड राज्यातील विधानसभा निवडणुका डिसेंबरअखेरीस किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात घेतल्या  जाती‍ल, असाही असा अंदाज आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राज्यात आचारसंहीता लागू होणार आहे.

वेबदुनिया मराठीचा एंड्रॉयड मोबाइल ऐप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. संपूर्ण साहित्य वाचण्यासाठी व तुमच्या सल्लासाठी आमच्याफेसबुक आणि ट्विटर पानावर फ़ॉलो करू शकता.