बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. विधानसभा निवडणूक 2014
Written By wd|
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 10 सप्टेंबर 2014 (16:26 IST)

हरियाणा: भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर

हरियाणात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या 43 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेले विरेंद्र सिंग यांच्या पत्नी प्रेमलता सिंग यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
 
पहिल्या यादीत हरियाणाचे माजी मंत्री जगदीश नेहरा (रानिया), कृष्णा गहलावत (राय), छतरपाल सिंग (हांसी) यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय भाजपने सात महिला आणि 11 तरुण उमेदवारांना संधी दिली आहे. अंबाला कॅटमधून भाजपचे प्रदेश सचिव अनिल विज, उछनाकलातून विरेंद्र सिंग यांची पत्नी प्रेमलता सिंग, बादलीमधून भाजपच्या किसान मोर्चाचे प्रमुख ओपी धनकड, पंचकुलातून ज्ञानचंद्र गुप्ता यांच्या नावाचा समावेश आहे.
 
रोहतकमधून भाजपचे युवा नेता कॅप्टन अभिमन्यू नारनौंद तर भाजप हरियाणा शाखाप्रमुख राम विलास शर्मा महेंद्रगढमधून निवडणूक लढवणार आहेत.