शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. सावरकर
Written By वेबदुनिया|

मदमत्त गूढांनो!

डॉ. सौ. उषा गडकरी

लहानपणी बरेच वेळा ऐकले होते,
वाचले होते आणि प्रत्यक्ष पाहिलेही होते
त्या महामानवाबद्दल खूप काही.

त्याच्या घणाघाती वक्तृत्वाची
जाज्वल्य देशप्रेमाने अभिमानित
असलेली ध्वनीफित ऐकुनही
रोमांच उभे राहिले होते अंगावर!

जाणवले होते, डोक्यावरच्या आभाळाच्या
विस्ताराला सीमा नसते, सागराच्या लाटाच्या
खोलीला पार नसतो, हिमालयाच्या उत्तुंग
शिखरांचा थांग लागत नाही,

तशीच त्याच्या धाडसाच्या गगनभरारीला सीमा नव्हती
धैर्याच्या मेरूमांदारांनाही चळचळा कापायला लावणार्‍या
भेदक दृष्टीचा तांग लागत नव्हता
मर्सेलिसर्‍या ऐतिहासिक उडीने
साक्षात जल महाभूताचे भेदन केले होते
दोन जन्मठेपी एकाच वेळी भोगत
सेल्युलर जेलरच्या कालकोठड्या नाही
थरथरायला लावले होते
कोलू ओढर्‍याच्या अमानुष शिक्षेने
पत्थरालाही पाझर फोडला होता
उत्स्फूर्त काव्यपंक्तिंनी रोमरोमात
राष्ट्रभिमानची ज्योत चेतवली होत

पतीतपावन चळवळीद्वारा
पददलितांचे अश्रु पुसले होते
ढोंगीपणा, दांभिकता, अंधश्रद्धा
यांना मूळापासून उखडून फेकून दिले होते
'रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले'?
असा खडा सवाल करून
गुलामीच्या, पारतंत्र्याच्या बेड्या
खळखळा तोडून टाकण्याचे आवाहन कले होते?
घरादावावर तुळशीपत्र ठेऊन, स्वांतंत्र्य वेदीच्या
होमकुंडात स्वत:ला झोकून दिले होते.
स्वातंत्र्यानंतर मात्र आजुबाजूच्या तथाकथीत
नामांकित, अतिविद्वान, स्वनामध्य शासकांच्या
अंतरंगातले खुजेपण, दाभिकता आणि कल्पना दारिद्रय
कुठुनतरी सणसणीत गोटा डोक्याला लागावा
आणि भळभळून रक्त यावे,
तसे वेदना देऊन गेले

सूर्यावर धुंकण्याच्या या प्रवृत्तिच्या
कसा आणि किती निषेध करावा
हे कळेनास झाले
परंतु लाल घोड्यांच्या घोळक्यांत
खोट्या शिक्यांच्या बद्द, बदसूर
आवाजाच्या तुलनेत
सुवर्णाच्या खणखणीत नाष्याचा नाद
अनाहत नादासारखा
अंर्तमनात अखंड चालू रहावा
तसा त्या महामानवाचा
समृद्ध वारसा घेऊन
स्वतंत्र भारतात आज आपण
सर्वच श्रीमंत झालो आहोत

भले ही काही नतदृष्टांना
ते पटो वा न पटो!
मदमस्त मूढांनो, ज्वालामुखीचे विवर उघडू नको