गुरूवार, 28 मार्च 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. विठ्ठल
Written By

vitthal : पंढरपूरचा पांडुरंग

पंढरपूरच पांडुरंगाची माहिती आपण जाणून घेऊ..
विठोबा वा विठ्ठल वा पांडुरंग ही देवता महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात वंदिली जाते. 
 
विठोबा हा प्रामुख्याने श्रीहरीचा द्वापार युगातील दुसरा आणि दशावतारातील नववा अवतार आहे. परंतु शास्त्र-पुराणांमध्ये विठ्ठलाला बौध्य वा बोधराज म्हटले आहे. 
 
गरुड पुराणामध्ये वर्णन केल्याप्रमाणे बौध्य हा विशाल भाल असलेला, तेजस्वी नेत्रांचा, मौन धारण केलेला, कटी कर ठेवून उभा असा आहे जे पूर्णपणे विठ्ठलाचे वर्णन आहे.  

विठोबाच्या  प्रतिमा ह्या कटीवर हात ठेवून, विटेवर उभ्या राहिलेल्या सावळ्या पुरुषाच्या वेषात दर्शवितात. विठोबा हा महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे व कर्नाटकातील हरिदास संप्रदायाचे आराध्य दैवत आहे.
 
मंदिर पंढरपूर येथे आहे. हे मंदिर कधी बांधले गेले हे निश्चित माहीत नसले तरी ते तेराव्या शतकापासून उभे आहे याचे पुरावे आढळतात. आलेले भाविक भीमा नदीमध्ये स्नान करतात. या नदीला येथे चंद्रभागा म्हणतात.