testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

आजचा 'पॉवर योगा', कालचा 'हठयोग'

yoga
वेबदुनिया|
म्हणजे 'हट्टाने केलेला योग' असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. समाधीवस्था प्राप्त करण्यासाठी हठयोग हा शेवटचा पर्याय मानला जातो. समाधीवस्थेसाठी शरीराला एवढा त्रास द्यावा की तो त्रासही एक अवस्था बनावी आणि व्यक्तिमत्वाचा भाग व्हावा. हठयोग म्हणजे समाधीवस्थेच्या मागे लागणे. सतत आणि निरंतर त्या अवस्थेचा पिच्छा पुरवणे.
सात हठ-> > षट्कर्मासनमुद्रा: प्रत्याहारश्च प्राणसंयाम:। ध्यानसमाधी सप्तैवांगनि स्युर्हठस्य योगस्य।।- षट्कर्म, आसन, मुद्रा, प्राणायम, प्रत्याहार, ध्यान व समाधी ही हठयोगाची सात अंगे आहेत.
हठयोगाचा जोर आसन, बंध, मुद्रा व प्राणायामावर अधिक असतो. शरीराच्या मध्यभागी असलेल्या मुलाधारचक्राखाली सुप्तावस्थेत असलेल्या कुंडलनी शक्तीला जागृत करून उर्वरित पाच चक्रांतून तिला सहस्त्रारचक्रापर्यंत नेण्याचा प्रवास या हठयोगाच्या माध्यमातून घडतो.

धौती, वस्ती, नेती, नौली व कपालभाती हे षटकर्म आहेत. हठयोग प्रदीपिकामध्ये दहा बंध मुद्रांचा उल्लेख असून त्याच्या अभ्यासवर भर देण्यात आला आहे. महामुद्रा, महा बंध, महावेधश्च, खेचरी, उड्डीयान बंध, मूल बंध, जालंधर बंध, विपरीत करणी, वज्रोली, शक्ती चालन या दहा मुद्रा दिव्य अनुभूती देणार्‍या आहेत. बंध चार व मुद्रा सहा असतात.

हठयोगाची सुरवात-
भगवान शंकराला हठयोगाचा प्रणेता मानले जाते. ऋग्वेदात वृषभनाथांचा उल्लेख आहे. ते दिगंबर हठयोगी होते. प्राचीन काळात मार्केंडेय ऋषी या योगाचे साधक होते.

मच्छिंद्रनाथांप्रमाणेच गोरखनाथ, चर्पटी, जालंधर, कनेडी, चतुरंगी, विचारनाथ, आदी नाथ संप्रदायी साधूंनी हठयोगाचा अंगीकार केला. त्याचा प्रचार व प्रसार केला. हठयोग्यांकडे हातात चिमटा व समोर धुनी असते. ते एकांतप्रिय व फिरस्ते असतात. शिवाची भक्ती ते करतात.

हठयोगाचे ग्रंथ-
गोरक्षशतक, गोरक्षसंहिता, सिद्धि-सिद्धांत पद्यति, सिद्धि-सिद्धांतसंग्रह, गोरक्षसिद्धांतसंग्रह, अमनस्क, योग-बीज, हठयोगप्रदीपिका, हठतत्वकौमुदी, घेरंडसंहिता, निरंजनपुराण हे हठयोगाचे ग्रंथ आहेत.

आधुनिक युगात हठयोग-
हठयोगाच्या अभ्यासातून अनेक रोगांपासून मुक्ती मिळू शकते. या योगाच्या अंगीकारामुळे मानसिक व शारीरिक शक्ती वाढते. तुमच्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल घडवून आणला जातो. स्वतःला बदलण्याची प्रक्रिया म्हणजे हठयोग आहे. आजच्या काळात त्याला 'पॉवर योगा' म्हणूनही ओळखले जाते.


यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी नियमित चाला

national news
वृद्धासांठी एक खुशखबर आहे. ज्या वृद्धांना विस्मृती किंवा स्मृतीभ्रंषाचा आजार आहे, त्यांना ...

मॅक्सिकन भेळ

national news
या कणकेच्या गोळ्याला 1/2 तास ओल्या कपड्याने झाकून ठेवावे. नंतर त्याला डायमंडशेपमध्ये ...

जेवल्यानंतर गार पाणी पिणे हानिकारक

national news
गार पाणी गळ्याला आणि पोटाला शांत करत असलं तरी काय आपल्याला हे माहीत आहे का की जेवल्यानंतर ...

तवा पनीर

national news
प्रथम पनीर, टोमॅटो, कांदा व सिमला मिरचीचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यावेत. आता गॅसच्या ...

शिळी पोळी खाण्याने मधुमेहावर नियंत्रण ठेवता येईल

national news
ज्यांना मधुमेहाची समस्या आहे, त्यांनी सकाळी रिकाम्या पोटी थंड दूध आणि रात्रीची शिळी पोळी ...