testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

परीक्षेचा ताण उच्छ्वासातून बाहेर टाका

- श्रेया चुग (संचालक, युथ एम्पॉवरमेंट प्रोग्राम, आर्ट ऑफ लिव्हिंग)

art of living
WD


परीक्षेच्या आधीचा अभ्यास :

१. चांगली झोप घ्या. शारीरिक आणि मानसिक विश्रांती शिवाय एकाग्रता सुधारत नाही. थकलेले मन नीट लक्ष देऊ शकत नाही आणि वाचलेले नीट लक्षातही ठेवू शकत नाही.

२. प्रयत्नपूर्वक सूर्योदयाच्या वेळी उठा काही सूर्य नमस्कार घाला आणि त्यांनतर नाडीशोधन प्राणायाम, उज्जयी श्वास यासारखे काही श्वसनाचे व्यायाम करा.अशाप्रकारे तुमच्या शरीरातील आणि आणि मनातील ताण निघून जाऊन ऊर्जा वाढेल.

३. ध्यान हे अभ्यासाचे साधन म्हणून वापरा. रोज अभ्यासाला सुरवात करण्यापूर्वी काही मिनिटे कोणतेही सोपेसे ध्यान करत जा. त्याने त्याने मन हलके होऊन,मन विचलित न होता, पटपट शिकून ते जास्त काळ लक्षात ठेवले जाईल.

४. एकदा तुम्ही सुरवात करायला तयार झालात की बसून अभ्यासाला सुरवात करा. मग कुठलीही करणे सांगायला नको आणि अभ्यास पुढे ढकलायलाही नको.

५. वेळाचे नियोजन करा : उजळणीचे वेळापत्रक आखा आणि त्यात अधून मधून विश्रांतीची वेळही ठेवा. गाणी ऐका,मित्र आणि कुटुंबियांशी गप्पा मारा. तुमच्या आवडत्या संगीतावर ३० मिनिटांपर्यंत नाच करा किंवा १० - १५ मिनिटे फिरून या. मग पुन्हा अभ्यासाला बसा. यामुळे तुम्ही केलेला अभ्यास आत्मसात होईल आणि एकाग्रताही वाढेल.

६. योग्य आहार घ्या : ताजे, हलके, घरी बनवलेले शाकाहारी अन्न खाल्यामुळे मन एकाग्र करण्याची तुमची क्षमता वाढेल आणि उर्जेत वाढ होईल. शिळे, आधीच पॅक् केलेले, खारवलेले, तेलकट किंवा गोड पदार्थ खाण्याने मंदपणा येतो.

७. काही मुले तुम्हाला भरीस घालतात तर काही तुम्हाला ‘ढ’म्हणतात. तुमची ध्येये तुमच्या मनात पक्की ठेवा आणि इतरांना त्याला धक्का लावू देऊ नका. हे तुमचे आयुष्य आहे आणि परिणामही तुमचे.

तर मन लावून अभ्यास करा आणि शांत रहा. अधिक माहितीसाठी क्लिक करा आर्ट ऑफ लिव्हिंग
वेबदुनिया|
आजच्या कठिण जीवनात आमच्या जवळ सर्व गोष्टींसाठी भरपूर वेळ आहे, पण आपल्या ताण-तणावाशी आपण स्वत:च आपल्या मनाशी भिडत राहतो. स्वत:साठी. जीवनातील या सर्व समस्यांमध्ये मनाला शांत कसे ठेवायचे, तणावातून मुक्ती कशी मिळवायची? या सर्व समस्यांचे समाधान फक्त ध्यान लावून दूर करू शकता.

या उद्देशानं बेवदुनिया आणि जगप्रसिद्ध फॉउंडेशन प्रस्तुत करीत आहे परीक्षेच्या काळात तुम्ही कसं तणाव मुक्त राहू शकता...

वर्षातला परीक्षेचा काळ पुन्हा आलेला आहे. चांगली कामगिरी करून दाखवण्याचा दबाव या काळात सगळ्यांवरच येतो. या चिंतेवर मात करण्याचा काही मार्ग आहे कां ? तुमची एकाग्रता वाढवण्याचा, अभ्यासातली रुची वाढण्यासाठी, पालकांच्या, शिक्षकांच्या आणि तुमच्या स्वत:च्या तुमच्याकडून असलेल्या अपेक्षांचे ओझे हाताळण्यासाठी मार्ग आहे कां ? सुदैवाने, होय, आहे. तुमचे मन शांत करण्यासाठी, एकाग्रता वाढवण्यासाठी आणि तुमचे ध्येय गाठण्यासाठी.

पुढील पानावर वाचा, परीक्षेच्या वेळेस काय करावे....यावर अधिक वाचा :

कोचीन शिपयार्डमध्ये भीषण स्फोट, ५ ठार, १५ गंभीर जखमी

national news
केरळमधील महत्वपूर्ण असलेल्या कोचीन शिपयार्डमध्ये भीषण स्फोट होऊन पाच ठार झाले असून 15 जण ...

धर्मा पाटील कुटुंबीयांना 54 लाखांचा मोबदला

national news
मंत्रालय विषप्राशन केल्यानंतर उपचारादरम्यान मृत्युमुखी पडलेले शेतकरी धर्मा पाटील यांच्या ...

चार वर्षांचा मुलगा पडला आर्केड मशीनमध्ये

national news
फ्लोरिडा- लहान मुले आपली आवडती खेळणी मिळवण्यासाठी काय करतील याचा भरवसा नाही. फ्लोरिडाच्या ...

भावनाप्रधान होऊ नका, राजकीय भेटीगाठी थांबवा : भुजबळ

national news
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे गेल्या २३ महिन्यांपासून कारागृहात आहेत. त्यांना मुंबई ...

शेतकरी कर्जमाफीच्या कामासाठी आजही बँका सुरु

national news
शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत मंजूर रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या ...