शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 जानेवारी 2021 (20:00 IST)

निद्रानाश ची समस्या असल्यास हे आसन करावे त्रास दूर होईल

आजकाल निद्रानाश हा एक आजार नसून सवय झाली आहे. दिवसभर कॉम्प्युटर वर सतत काम करत राहणे, तणाव असणे, चिडचिड करणे, रात्री झोपताना मोबाईल हाताळणे आणि या मुळे झोप न येणे हे सामान्य आहे. झोप पूर्ण न झाल्यावर दुसऱ्या दिवशी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या थकलेले असतो. दीर्घकाळापर्यंत निद्रानाश च्या त्रासाला बळी पडल्यावर लवकरच एखाद्या मोठ्या आजाराने वेढलेले जाऊ शकता. परंतु  योगामध्ये असे काही आसन आहेत जे या निद्रानाश च्या समस्येपासून सुटका देतात.चला तर मग जाणून घेऊ  या. 
 
* बालासन - 
निद्रानाश ला दूर करण्यासाठी बरीच आसने करतात पण या मध्ये सर्वोत्कृष्ट आहे बालासन. या आसनाच्या सरावाने शरीराला आराम मिळतो. हे मज्जासंस्था शांत ठेवण्यासाठी मदत करतो. ह्याचा दररोज च्या सरावाने चांगली झोप येते. हे सकाळी केले जाते.रात्री जेवण्याच्या आणि झोपण्याच्या दरम्यान 2 ते 3 तासांचा वेळ असल्यास तेव्हा आणि झोपण्याच्या पूर्वी देखील  15 -30 सेकंद आपण ह्याचा सराव करू शकता.
 
* पश्चिमोत्तासन -  
  हे आसन केल्याने शरीराचा पुढील भाग ताणला जातो. या मुळे शरीरास आराम मिळतो. शरीर तणाव मुक्त होत सांध्यातील वेदना देखील नाहीशी होते.म्हणून चांगली झोप येण्यासाठी दररोज सकाळी ह्या आसनाचा सराव करावा. हे आसन करताना असे आवश्यक नाही की डोकं पूर्णपणे गुढघ्या पर्यंत न्यावे. आपण क्षमतेनुसार शक्य तितके डोकं वाकवा. 
 
* हलासन -
ह्या आसनाला हलासन म्हणून म्हणतात की हे आसन करताना जे आकार बनत ते नांगराप्रमाणे असतं. या आसनाच्या नियमित सरावाने दररोज ठरलेल्या वेळी झोप येते. हे आसन केल्यानं पोटाच्या समस्येत आणि तणावात  देखील आराम मिळतो. हिवाळ्याच्या दिवसात हे केल्यानं शरीरात उबदारपणा राहतो ज्यामुळे पलंगावर निजतातच झोप येते.
 
* शवासन-
शरीराला आराम देण्यासाठी शवासन हा चांगला पर्याय आहे. या आसनाचे वैशिष्ट्य म्हणजे की हे आसन कधी केले जाऊ शकते. जर आपण काही काळ शवासनात राहिला तर आपल्याला झोप येऊ लागते. रात्री झोपण्याच्या पूर्वी शवासनाच्या स्थितीत झोपा आणि दीर्घ श्वास घेण्याचा सराव करा आपले लक्ष श्वासावर केंद्रित करा. लवकरच झोप येईल.