शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: मंगळवार, 9 जून 2015 (10:53 IST)

योगदिनाच्या कार्यक्रमातून सूर्यनमस्कार आऊट

जागतिक योगदिनाच्या सक्तीला एमआयएम आणि काही मुस्लीम संघटनांनी आक्षेप घेतल्यावर आता सरकारने एक पाऊल मागे घेतलं आहे. योग दिवसाच्या मुहूर्तावर सूर्यनमस्कार केले जाणार नाहीत असा निर्णय सरकारनं घेतला आहे. योगगुरु बाबा रामदेव यांनी ही माहिती दिलीय. 21 जून रोजी देशभर जागतिक योग दिवस साजरा केला जाणार आहे. पण मुस्लीम धर्मात सूर्याला नमस्कार केला जात नाही त्यामुळे एमआयएम आणि काही मुस्लीम संघटनांनी योग दिवसावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर सरकारने 21 जूनला सूर्यनमस्काराला बगल दिली आहे. पण या निर्णयामुळे योग अभ्यासक मात्र नाराज आहेत. त्यामुळे योगदिनाच्या सूर्यनमस्कारावरुन सुरु असलेला वाद शमण्याचं नाव घेत नाही.