शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. योग
  4. »
  5. योगासन
Written By वेबदुनिया|

शीर्षासन

शीर्ष म्हणजे डोके व डोक्यावर संपूर्ण शरीराचा भार टाकून केल्या जाणार्‍या आसनाला 'शीर्षासन' म्हटले जाते.

पद्धत- दोन्ही पायाची गुढघे जमिनीवर टेकवून दोन्ही हाताची पंजे देखील जमिनीवर टेकवावे. त्यानंतर हाताची बोटे मिळवून चांगल्याप्रकारे ग्रिप बनवून घ्यावे. त्यानंतर आपले डोके ग्रिप बनवलेल्या हातांच्या जवळ टेकवावे. त्यामुळे डोक्याला हातांचा आधार मिळेल.

गुढघे जमिनीपासून वर उचलून पाय लांब करावे. त्यानंतर हळू हळू हाताची पंजे डोक्याच्या जवळ घ्यावे व लांब केलेल्या पायांच्या पंज्यांना देखील एकमेकाच्या जवळ करावे. व संपूर्ण शरीराचा भार जमिनीला टेकलेल्या डोक्यावर द्यावा. काही वेळ या अवस्थेत राहून पुन्हा आधीच्या अवस्थेत येण्यासाठी पाय गुढघ्यामध्ये मोडून गुढघे पोटाच्या जवळ आणून पायाची पंजे जमिनीला टाकवावे. त्यानंतर डोके जमिनीवर काही वेळ टेकवावे व जमिनीवरून डोके उचलून वज्रासनमध्ये बसून आधीच्या स्थितीत यावे.

WD
सावधगिरी - सुरवातीला शीर्षासन भिंतीचा आधार घेऊन योगशिक्षकाच्या देखरेखीत करावे. डोके जमिनीला टेकवताना आधी हे लक्षात घ्या की, डोक्याचा मध्य भाग जमिनीवर टेकलेला आहे. डोके अशा पद्धतीने जमिनीवर टेकवावे की, त्यामुळे मान व पाठीचा कणा सरळ रेषेत ताठ राहील. पायांना देखील हळू हळू वर उचलावे. व सामान्य स्थितीत येण्यासाठीही एकदम झटक्याने जमिनीवर न ठेवावे. ज्या व्यक्तीला डोके, पाठ व पोटाचे विकार असतील त्यांनी शीर्षासन करू नये.

फायदे - शीर्षासन केल्याने पाचनक्रियेत लाभ होतो. शीर्षासन नियमित केल्याने मस्तिष्कमध्ये रक्त प्रवाह सुरळीत होतो व वाढतो. तसेच स्मरणशक्ती वाढते. हर्निया, अपचन आदी आजारावर उत्तम उपाय आहे. अवेळी केस गळणे व पांढरे होणे कमी होते.