शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By वेबदुनिया|

सर्वांगासन अर्थात संपूर्ण अंगाला समावून घेणे

सर्व म्हणजे संपूर्ण, अंग आणि आसन म्हणजेच संपूर्ण अंगाला समावून घेणारे आसन ते सर्वांगासन. हे आसन केल्याने संपूर्ण शरीराला व्यायाम मिळतो.
 
कृती : पाठीच्या आधारे सरळ झोपावे. दोन्ही पाय सरळ पुढे पसरवून दोन्ही हात बगलेत ठेवावेत. श्वास आत घेऊन गरजेनुसार हाताच्या मदतीने पायांना हळू हळू 30 डिग्री, मग 60 डिग्री आणि शेवटी 90 डिग्री पर्यंत उचलावे.
 
90 डिग्रीवर जर सरळ होत नसतील तर 120 डिग्रीपर्यंत पायांना वर उचलावे व हातांना कमरेपर्यंत मागे घेऊन जावे.
 
या क्रियेनंतर पायांना सरळ ठेवून मागे थोडे वाकावे. दोन्ही हातांना कमरेपासून दूर करून जमिनीवर सरळ करावे. आता पंजाच्या सहाय्याने जमिनीवर दाब देऊन ज्या क्रमाने सुरूवातीची क्रिया केली होती, त्याच्या उलट क्रमाने हळू हळू आधी पाठ आणि मग पायांना जमिनीवर सरळ करावे. जितका वेळ सर्वांगासन केले जाते तेवढ्याच वेळेपर्यंत शवासनमध्ये विश्राम करावा.
 
सूचना - कोपरे जमिनीवर टेकलेले असावेत आणि पाय सरळ ठेवावे. पंजेवर ताठ केलेले व डोळे बंद हवे आणि पायांच्या अंगठ्यावर लक्ष ठेवायला पाहिजे. ज्या लोकांना मानेचे दुखणे असेल त्यांनी हे आसन करणे टाळावे.
 
फायदा - दमा, लट्ठपणा, कमजोरी व थकवा दूर होतो. या आसनाचे पूरक आसन म्हणजेच मत्स्यासन आहे, म्हणूनच शवासनात विश्रामाच्या आधी मत्स्यासन केल्याने अधिक फायदा मिळतो.