राशी फळ
मेष - व्यवसाय
मेष राशितील लोक विद्युत, खनिज, सिमेंट, मेडिकल स्टोअर, कोळसा, खनिज तेल, वैद्यक, फटाक्यांचा व्यवसाय, खेळण्यात, रंग व्यवसाय जमिन खरेदी-विक्री कुस्ती घड्याळ रेडीअो तंबाखू केमिस्ट्री इत्यादीत यशस्वीपणे व्यवसाय करू शकतात. व्यवसायातून चांगल्या प्रकारे पैसे गोळा करतात. वरील व्यवसायांपैकी कोणताही व्यवसाय त्यांनी केला तर ते त्यांच्यासाठी चांगले आहे. व्यवसायात आपले डावपेच बरोबर असतात व आपली आर्थिक स्थिती सहसा चांगली असते, विशेषत: एखादी नवी गुंतवणूक किंवा करार करताना आपण स्वत:चे मूल्यांकन फार जास्त करता. मेष राशिवाल्यांनी कर्क सिंह वृश्चिक धनू तसेच मीन व्यक्तींबरोबर भागिदारीत ‍धंदा केल्यास लाभदायक ठरेल तसेच त्यांच्याशी मैत्रि लाभदायक ठरेल. या राशितील स्त्रियांपण व्यवसायात विशेष यश मिळवतील.
राशी फळ